________________
कर्माचे विज्ञान
३७
काळानंतर फळ देईल, तो पर्यंत ते सर्व संचित. संचित सर्व पडून राहिलेले असतात. हळू हळू कालांतराने जसे जसे परिपक्व होत असतात, तस तसे ते फळ देतात.
आणि क्रियमाण तर डोळ्यांनी दिसते, पाच इन्द्रियांनी अनुभवता येते ते क्रियमाणकर्म. अश्या तीन प्रकारे कर्म ओळखली जातात. लोक म्हणतात बघा ना याने तर दोन थोबाडीत मारल्या. थोबाडीत मारणाऱ्याला पाहतात, थोबाडीत खाणाऱ्याला पाहतात, ते क्रियमाण कर्म आहे. आता क्रियमाणकर्म म्हणजे काय? फळ देण्यास जे सन्मुख झाले, ते हे फळ. त्या व्यक्तिला असे फळ आले की दोन थोबाडीत मारल्या गेल्या आणि मार खाणाऱ्याला असे फळ आले की त्याने दोन थोबाडीत खाल्ल्या. आता या क्रियमाणाचे पुन्हा फळ येते. कारण त्या ज्या दोन थोबाडीत मारल्या होत्या ज्यामुळे तो मनात खूणगाठ बांधतो की जेव्हा माझ्या तावडीत सापडेल, त्यावेळी बघून घेईल. म्हणून मग तो नंतर त्याचा बदला घेतो. त्यामुळे पुन्हा असे नवीन बीज पडतच जातात. नवीन बीज तर आत टाकतच जातो. बाकी संचित तर फक्त असेच पडून राहिलेला, स्टॉकमध्ये ठेवलेला माल आहे. पुरूषार्थ ही वस्तु वेगळी आहे. क्रियमाण तर प्रारब्धाचा रिजल्ट आहे, प्रारब्धाचे फळ
आहे.
प्रश्नकर्ता : या पुरुषार्थाला तुम्ही कर्मयोग म्हणता का?
दादाश्री : कर्मयोग समजून घेतले पाहिजे. कर्मयोग जो भगवंतांनी लिहिलेला आहे आणि लोक ज्याला कर्मयोग म्हणतात, ह्या दोन्हींमध्ये आकाश-पाताळ एवढा फरक आहे.
पुरूषार्थ म्हणजे कर्मयोग खरे, पण कसा कर्मयोग? ऑन पेपर योजना, हे कर्मयोग म्हटले जाते. हे कर्मयोग जे झाले, त्याचा मग हिशोब बांधला गेला, त्याच्या फळास संचित म्हटले जाईल आणि संचित जे आहे ते सुद्धा योजनेतच आहे, पण जेव्हा फळ देण्यास सन्मुख होते तेव्हा प्रारब्ध म्हटले जाते. आणि प्रारब्ध जेव्हा फळ देते तेव्हा क्रियमाण उभे रहाते. पुण्य असेल तर चांगले क्रियमाण होतात, पाप येते तेव्हा उलटे क्रियमाण होतात. (मनाविरूद्ध घडते)