________________
कर्माचे विज्ञान
जन्मतः अपंग वगैरे असतात. पांगळे असतात. कितीतरी लहान मुले कुतुबमिनार आणि हिमालय दर्शनाच्या दुर्घटनेत मरून जातात. तर या छोट्या-छोट्या मुलांनी काय पाप केले असेल, म्हणून त्यांच्या सोबत असे घडले?
दादाश्री : पाप केलेच होते, त्याचा हिशोब चुकता झाला. म्हणून दिड वर्षाचा झाल्याबरोबर, आई-वडील आणि सर्वांसोबतचा हिशोब पुर्ण झाला म्हणून निघून गेला. हिशोब चुकता केला पाहिजे. हे हिशोब चुकते करण्यासाठी तर येतात.
प्रश्नकर्ता : आई-वडीलांनी केलेल्या दुष्कृत्याचे फळ देण्यासाठी ते मुल आले होते का?
दादाश्री : आई-वडीलांसोबत जो हिशोब नियोजित आहे, जेवढे दुःख द्यायचे असेल तेवढे दुःख देऊन जातो आणि सुख द्यायचे असेल तर सुख देऊन जातो. जर एक-दोन वर्षाचा होऊन मरुन जातो, तर तो थोडेसेच दुःख देऊन जातो. आणि जर-बावीस वर्षाचा लग्न करून मरतो तर जास्त दुःख देतो. असे घडते की नाही?
प्रश्नकर्ता : असे तर घडते, बरोबर आहे.
दादाश्री : म्हणजे हे दु:ख देण्यासाठी असते आणि कित्येक तर वयाने मोठे होऊन सुख देतात. शेवटपर्यंत, संपूर्ण आयुष्य सुख देतात. हे सर्व सुख आणि दुःख देण्यासाठीच सर्वांचे एकमेकांशी संबंध जोडले गेले आहेत. हे रिलेटीव संबंध आहेत.
आजच्या कुकर्माचे फळ ह्या जन्मातच? प्रश्नकर्ता : हे जे कर्माचे फळ येते, जसे उदाहरणार्थ आपण एखाद्याच्या विवाहात विघ्न आणले. तर मग पुन्हा असेच फळ आपल्याला पुढील जन्मी मिळते का? आपला विवाह होत असताना तोच मनुष्य विघ्न निर्माण करेल का? अशा प्रकारे कर्माचे फळ असते का? अशाच प्रकारे आणि तेवढ्याच डिग्रीचे?