________________
कर्माचे विज्ञान
:
दादाश्री : त्याने जाणतेपणी पुण्य बांधले होते, त्यामुळे ते जाणतेपणी भोगले. आणि त्या मुलाने अजाणतेपणी पुण्य बांधले होते त्यामुळे अजाणतेपणी भोगले. अर्थात, अजाणतेपणी पाप बांधले गेले, तर अजाणतेपणाने भोगले जाते. आणि अजाणतेपणी पुण्य केले तर अजाणतेपणी भोगले जाते. त्यात मजा येत नाही. हे लक्षात येत आहे ना?
३९
अजाणतेपणी केलेल्या पापा बद्दल मी तुम्हाला समजावतो. या बाजूने दोन झुरळे जात होती, मोठी-मोठी झुरळं आणि ह्या बाजूने दोन मित्र जात होते. तेव्हा त्यातील एका मित्राचा पाय झुरळावर पडला, आणि त्यात ते झुरळ चिरडले गेले आणि दुसऱ्या मित्राने झुरळाला पाहताच त्याला ठेचून ठेचून मारले. दोघांनी काय काम केले?
प्रश्नकर्ता : झुरळांना मारले.
दादाश्री : निसर्गाच्या नियमाप्रमाणे दोघे खुनी मानले जाणार. त्या झुरळांच्या कुटूंबियांनी तक्रार केली की आमच्या दोघांच्या पतींना ह्या मुलांनी मारून टाकले. दोघांचा गुन्हा सारखाच आहे. दोघेही गुन्हेगार खूनी म्हणूनच पकडले गेले. खून करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पण आता ह्या दोघांना याचे फळ काय मिळते? तेव्हा काय, तर त्या दोघांना दोन थोबाडीत आणि चार शिव्या, अशी सजा झाली. आता ज्याच्याकडून हे सर्व अजाणतेपणी घडले होते, तो माणूस दुसऱ्या जन्मी मजूर बनला होता, आणि त्याला कोणीतरी दोन थोबाडीत मारल्या व चार शिव्या दिल्या. तर त्याने थोडे पुढे जाऊन झटकून दिले. आणि तो दुसरा माणूस पुढील जन्मात गावाचा सरपंच बनला होता, खूप मोठा, अत्यंत चांगला माणूस. त्याला कोणीतरी दोन थोबाडीत मारल्या व चार शिव्या दिल्या, ज्यामुळे तो कितीतरी दिवसांपर्यंत झोपू शकला नाही. किती दिवस भोगले! ह्याने तर जाणूनबुजून मारले होते, आणि मजुराने अजाणतेपणी मारले होते. अर्थात हे सर्व समजून करा. जे पण कराल ना, ती जबाबदारी स्वत: :चीच आहे. यू आर् होल एन्ड सोल रिस्पॉन्सिबल. गॉड इज नॉट रिस्पॉन्सिबल एट ऑल. (तुम्हीच संपूर्णपणे जबाबदार आहात, भगवंत यत्किंचितही जबाबदार नाही)