________________
५०
कर्माचे विज्ञान
घेण्याची आवश्यकता आहे, जीवन जगण्याची कला जाणून घेण्याची गरज आहे. सर्वांचाच मोक्ष होत नाही पण जीवन जगण्याची कला, ही तर असायला पाहिजे ना!
अमंगल पत्र, पोस्टमनचा काय गुन्हा? दुःख सर्व नासमजूतीमुळेच आहे, या जगात ! स्वतः उभे केलेले आहे सर्व, स्वत:ला दिसत नसल्यामुळे! भाजते तेव्हा विचारतो ना की, भाऊ तुम्हाला कसे भाजले? तेव्हा सांगतो, 'चुकून भाजलो, मुद्दाम भाजून घेईल का मी?' असे हे सर्व दु:खं आपल्या चूकांचा परिणाम आहे. चुक निघून गेली की मग झाले.
प्रश्नकर्ता : कर्म चिकट असतात, त्यामुळे आपल्याला दुःख भोगावे लागते का?
दादाश्री : आपणच केलेली कर्म आहेत, म्हणून आपलीच चुक आहे. इतर कोणाचीही चुक या जगात आहेच नाही. इत्तर सर्व तर, निमित्त मात्र आहेत. दुःख तुमचेच आहे. आणि ते समोरच्या, निमित्ताच्या हातून दिले जाते. वडील वारल्याचे पत्र पोस्टमन देऊन गेला, त्यात पोस्टमनचा काय दोष?
पूर्व जन्माचे ऋणानुबंधी प्रश्नकर्ता : आपले जे नातेवाईक असतात किंवा पत्नी असेल, मुले असतील, आज जे आपले नातेवाईक ऋणानुबंधी असतात, त्यांच्यासोबत आपला पूर्वजन्माचा काही संबंध असतो म्हणून एकत्र येतात का?
दादाश्री : खरं आहे, ऋणानुबंधाशिवाय तर काही असतच नाही ना! सर्व हिशोब आहे. एकतर आपण त्यांना दु:ख दिले आहे किंवा त्यांनी आपल्याला दुःख दिलेले आहे. उपकार केले असतील तर त्याचे फळ आता गोड येईल. दुःख दिले असेल, त्याचे फळ कडू येईल.
प्रश्नकर्ता : समजा की आता, मला एखादा व्यक्ती त्रास देत असेल आणि मला दु:ख होत असेल, तर हे जे दुःख मला होत आहे ते तर माझ्याच