________________
२६
कर्माचे विज्ञान
केवळ ज्ञानातच हे दिसते
प्रश्नकर्ता : हे कर्म नवे आहे की जुने आहे हे कशा प्रकारे दिसते?
दादाश्री : कर्म केले की नाही केले, हे तर कोणीही पाहू शकत नाही. हे तर भगवंत की ज्यांना केवळज्ञान आहे तेच जाणू शकतात. ह्या जगात जी कर्म तुम्हाला दिसतात, त्यात एका राई एवढे कर्म पण नवीन नाही आहे. ह्या कर्मांचे जर ज्ञाता - दृष्टा राहिलात तर नवे कर्म बांधले जाणार नाही आणि जर तन्मयाकार ( एकाकार) झालात तर नवे कर्म बांधले जातील. आत्मज्ञानी झाल्यानंतरच कर्म बांधली जात नाहीत.
ह्या जगात आत्मा दिसत नाही, कर्मही दिसत नाहीत पण कर्मफळ दिसते. लोकांना कर्मफळ येते तेव्हा त्यात गोडी वाटते म्हणून त्यात तन्मयाकार होतात, त्यामुळे भोगावे लागते.
आता कुठून आले मेले?
प्रश्नकर्ता : पुष्कळ वेळा असे होते की, आपण अशुभ कर्म बांधत असतो आणि त्यावेळी बाहेरील उदय शुभ कर्माचा असतो ?
दादाश्री : हो, असे होत असते. आता तुमचा शुभ कर्माचा उदय असेल पण आत तुम्ही अशुभ कर्म बांधत असाल.
तुम्ही बाहेर गावाहून इथे शहरात आले असाल आणि रात्री उशीर झाला असेल तर आत विचार येतो की आता आपण कुठे झोपणार? मग तुम्ही म्हणता की इथे माझा एक मित्र राहतो, तेथे आपण जाऊया. म्हणजे ते चार जण व पाचवे तुम्ही, साडे अकरा वाजता त्या मित्राच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावता. तो विचारतो, कोण आहे? तेव्हा तुम्ही सांगता 'मी आहे.' तेव्हा तो म्हणतो, ‘उघडतो.' दरवाजा उघडल्यावर तो तुम्हाला काय म्हणतो? पाच जणांना बघतो, तुम्हाला एकट्याला बघत नाही, तर सोबत चार-पाच जणांना बघतो, त्यावर तुम्हाला काय म्हणेल? 'परत जा' असे म्हणेल का?
‘या या तुमचे स्वागत आहे !' आपल्याकडे तर सर्व खानदानी माणसं, ‘या या स्वागत आहे!' असे बोलुन घरात घेतात.