________________
२४
आहे?
कर्माचे विज्ञान
'व्यवस्थित शक्ति' आणि कर्म
प्रश्नकर्ता : आपण जे ‘व्यवस्थित शक्ति' म्हणत आहात ते कर्मानुसार
दादाश्री : जग काही कर्माने चालत नाही. जगाला 'व्यवस्थित शक्ति' चालवते. तुम्हाला येथे कोण घेऊन आले आहे? कर्म? नाही. तुम्हाला ‘व्यवस्थित शक्ति' घेऊन आली आहे. कर्म तर तुमच्या आत पडलेलेच होते. मग ते तुम्हाला काल का नाही घेवून आले आणि आजच का घेऊन आले? 'व्यवस्थित शक्ति' काळाला एकत्र करते. भाव एकत्र करते. सर्वच संयोग एकत्र आले, त्यामुळे तुम्ही येथे आलात. कर्म तर 'व्यवस्थित' चा एक अंश आहे. हे तर संयोग जुळतात तेव्हा म्हणतो, 'मी केले' आणि संयोग जुळत नाही तेव्हा?
फळ मिळते ऑटोमेटिक
प्रश्नकर्ता : कर्माचे फळ जर कोणी दुसऱ्याने दिले तर मग ते कर्मच झाले ना?
दादाश्री : कर्माचे फळ दुसरा कोणी देतच नाही. कर्माचे फळ देणारा कोणी जन्माला आलाच नाही. इथे फक्त ढेकून मारण्याचे औषध प्यायले तर मरूनच जाणार, त्यात फळ देण्यासाठी दुसऱ्या कोणाचीही गरज लागत नाही.
फळ देणारा कोणी असता तर खूप मोठे ऑफीस बनवावे लागले असते. हे तर सायन्टिफिक पद्धतीने चालते. त्यात कोणाची गरजच नाही ! त्याचे कर्म जेव्हा परिपक्व होते तेव्हा फळ येवून उभे राहतेच. स्वत:हून, आपोआप. जसे ह्या कच्च्या कैऱ्या स्वत:हूनच पिकतात ना ! पिकतात की नाही?
प्रश्नकर्ता : हो, हो.
दादाश्री : आंब्याच्या झाडावर पिकत नाही का? ती जशी पिकते ना, तशाच प्रकारे हे कर्म परिपक्व होते. त्याची वेळ येते ना तेव्हा परिपक्व होऊन फळ देण्यास लायक बनते.