Book Title: Karmache Vignan
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 46
________________ कर्माचे विज्ञान नसेल का? याप्रमाणे संपूर्ण थियरी मुलाला समजवावी लागते. एकदा त्याच्या मनात पक्के ठसायला हवे की हे चुकीचे आहे. तुम्ही त्याला सारखे मारत राहता, त्यामुळे तर मुलगा जिद्दी बनतो. अर्थात फक्त पद्धतच बदलावयाची आहे. संपूर्ण जग फक्त स्थूळकर्मालाच समजले आहे. सुक्ष्मकर्माला समजलेच नाही. सुक्ष्माला समजले असते तर ही दशा झाली नसती. ३३ चार्ज आणि डिस्चार्ज कर्म प्रश्नकर्ता: स्थूळकर्म आणि सूक्ष्मकर्माचे कर्ता वेगवेगळे आहेत का? दादाश्री : दोन्हीचे कर्ता वेगळे आहेत. हे जे स्थूळकर्म आहेत, ते डिस्चार्ज कर्म आहे. ह्या बॅटऱ्या असतात, त्यांना चार्ज केल्यानंतर त्या डिस्चार्ज होत राहतात ना? आपल्याला डिस्चार्ज करायचे नसले तरी सुद्धा डिस्चार्ज होतच राहते ना? प्रश्नकर्ता : होय. दादाश्री : अश्याच प्रकारे हे स्थूळकर्म पण डिस्चार्ज कर्म आहे आणि आत जे नवीन चार्ज होत आहे ते सुक्ष्मकर्म आहे. ह्या जन्मात जे चार्ज होत आहे ते पुढच्या जन्मी डिस्चार्ज होत राहतील आणि ह्या जन्मात मागच्या जन्माची बॅटरी डिस्चार्ज होत राहिली आहे, एक मनाची बॅटरी, एक वाणीची बॅटरी आणि एक देहाची बॅटरी. या तिन्ही बॅटऱ्या आता डिस्चार्ज होतच राहिल्या आहेत आणि आत नवीन तीन बॅटऱ्या भरल्या जात आहेत. हे बोलतो आहे, ते तुला असे वाटेल की, 'मी' च बोलत आहे. पण नाही, ही तर रेकॉर्ड बोलत आहे. ही वाणीची बॅटरी डिस्चार्ज होत राहिली आहे. मी बोलतच नाही आणि संपूर्ण जगातील लोक काय म्हणतील की, 'मी कशी गोष्ट केली, मी कसे बोललो!' हे सगळे कल्पित भाव आहेत, इगोइझम (अहंकार) आहे, फक्त हा इगोइझम गेला तर मग दुसरे काय उरले? हा इगोइझम हीच अज्ञानता आहे आणि हीच भगवंताची माया आहे. कारण की करतो दुसरा कोणीतरी आणि स्वत:ला असे एडजस्टमेंट होते (वाटते) की 'मीच करत आहे. '

Loading...

Page Navigation
1 ... 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94