________________
कर्माचे विज्ञान
हे सुक्ष्मकर्म जे आत चार्ज होतात, ते नंतर कॉम्प्युटर मध्ये जातात. एक व्यष्टि कॉम्प्युटर आहे आणि दुसरे समष्टि कॉम्प्युटर आहे. सुक्ष्मकर्म प्रथम व्यष्टि कॉम्प्युटरमध्ये जातात आणि तेथून मग समष्टि कॉम्प्युटर मध्ये जातात. नंतर समष्टि काम करत राहते. रियली स्पिकींग, म्हणजे खरोखर 'मी चन्दुभाऊ आहे' असे बोलणे त्यानेच कर्म बांधली जातात. 'मी कोण आहे' एवढेच जरी समजले तर तेव्हापासूनच सर्व कर्मातून सुटला. अर्थात हे विज्ञान सरळ आणि सोपे ठेवले आहे, नाहीतर करोडो उपायांनी सुद्धा एब्सोल्युट होता येइल असे नाही. आणि हे तर पुर्णपणे एब्सोल्युट थियरम आहे.
३४
कर्म-कर्मफळ-कर्मफळ परिणाम
प्रश्नकर्ता : मागच्या जन्मी चार्ज झालेली जी कर्म आहेत, ते या जन्मी डिस्चार्जरूपे येतात. तर या जन्माची जी कर्म आहे, ते या जन्मीच डिस्चार्जरूपाने येतात की नाही ?
दादाश्री : नाही.
प्रश्नकर्ता : तर केव्हा येतात?
दादाश्री : मागच्या जन्मातील जे कॉझीझ आहेत ना ते ह्या जन्माचा इफेक्ट आहे. या जन्माचे कॉझीझ पुढील जन्माचे इफेक्ट आहेत.
प्रश्नकर्ता : पण कित्येक कर्म असेही असतात ना की, जे इथल्या इथे भोगावे लागतात. एक वेळा, आपण असे सांगितले होते.
दादाश्री : हे तर या जगातील लोकांना असे वाटते. जगातील लोकांना काय वाटते? 'हं... बघ, हॉटेलमध्ये खूप खात होता ना त्यामुळे पोटात मुरड पडली.' हॉटेलात नेहमी खात होता, म्हणून त्याने हे कर्म बांधले. त्यामुळे ही पोटात मुरड पडली, असे म्हणतात. तेव्हा 'ज्ञानी' काय सांगतात की तो हॉटेलमध्ये का खात होता? त्याला असे हॉटेलमध्ये खायचे कोणी शिकवले? हे कसे घडले ? संयोग उभे झाले. पूर्वी जी योजना केली होती त्या योजनेचा आता परिणाम आला म्हणून तो हॉटेलमध्ये गेला.