Book Title: Karmache Vignan
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 45
________________ कर्माचे विज्ञान (सुविधा) झाली आहे. बायकोला सोडून पळून जाता येते का? अरे बायकोला सोडून पळून जायचे आणि आपला मोक्ष होणार, हे शक्य आहे का? कोणाला दुःख देऊन आपला मोक्ष होणार, हे शक्य आहे का? म्हणून बायको-मुलांच्या प्रति असलेली सर्वच कर्तव्ये पूर्ण करावी आणि पत्नी जे जेवण वाढेल, ते निवांतपणे जेवा ते सर्व स्थूळ आहे. हे समजून घ्या. स्थूळच्या मागे तुमचा अभिप्राय असा असायला नको की ज्यामुळे सुक्ष्ममध्ये चार्ज होईल. त्यासाठी मी तुम्हाला आज्ञारूपी पाच वाक्ये दिली आहेत. आतमध्ये असा अभिप्राय रहायला नको की हे करेक्ट आहे. मी जे करतो, जे उपभोगतो, ते करेक्ट आहे. आत असा अभिप्राय असायला नको. बस एवढाच तुमचा अभिप्राय बदलला की सर्वच बदलून गेले. अशाप्रकारे वळवा मुलांना मुलांमध्ये वाईट गुण असले तर आई-वडील त्यांना रागवतात, आणि सांगत फिरतात की 'माझा मुलगा असा आहे, नालायक आहे, चोर आहे.' अरे, तो असे करतो, तर जे केले त्यास बाजूला ठेव. पण आता त्याचे भाव बदल ना! त्याचे आतील अभिप्राय बदल ना! त्याचे भाव कसे बदलावयाचे ते आई-वडीलांना जमत नाही. कारण की सर्टिफाइड आई-वडील नाहीत आणि आई-वडील होऊन बसले आहेत! मुलाला चोरी करण्याची वाईट सवय लागली असेल तर आई-वडील त्याला सारखे रागवत असतात. मारत राहतात. अशाप्रकारे आई-वडील नेहमी एक्सेस (गरजेपेक्षा जास्त) बोलतात. एक्सेस बोललेले हेल्प करत नाही. मग मुलगा काय करतो? तो मनात नक्की करतो की 'वाटेल ते बोलू दे', मी तर असेच करणार. तर अशाप्रकारे आई-वडील मुलांना आणखीन जास्त चोर बनवतात. द्वापार, त्रेता आणि सत् युगात जी हत्यारं होती, त्याचा वापर आजच्या कलियुगातील लोक करु लागले. मुलाला वळवायची पद्धत वेगळी आहे. त्याचे भाव बदलायचे आहेत. त्याच्यावर प्रेमाने हळूवार हात फिरवून त्याला सांगावे की, 'ये बेटा, भले तुझी आई ओरडली, ती ओरडेल, पण तु ज्याप्रकारे कोणाची चोरी केली तशी कोणी तुझ्या खिशातून चोरी केली तर तुला सुख वाटेल का?' त्यावेळी तुला कसे दुःख होईल? तर तसेच समोरच्या व्यक्तिलाही दुःख होत

Loading...

Page Navigation
1 ... 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94