________________
कर्माचे विज्ञान
प्रश्नकर्ता : तर कशाची गरज आहे?
दादाश्री : आत सद्भावनेची गरज आहे. चांगले कर्म तर जर प्रारब्ध चांगले असेल तर होऊ शकेल. नाही तर नाही होऊ शकणार. पण चांगली भावना तर होऊ शकते, जरी प्रारब्ध चांगले नसेल तरीही.
वाईट कर्माचे फळ केव्हा? प्रश्नकर्ता : चांगले किंवा वाईट कर्माचे फळ ह्याच जन्मात किंवा पुढील जन्मात भोगावे लागते, तर तसे जीव मोक्षगती कशाप्रकारे प्राप्त करू शकतील?
दादाश्री : कर्माचे फळ नुकसान करत नाही. कर्माचे बीज नुकसान करतात. मोक्षात जाण्यासाठी कर्मबीज टाकायचे बंद झाले की कर्मफळ त्याला अडथळा निर्माण करू शकत नाही, कर्मबीज अडथळा निर्माण करतात. बीज कशामुळे अडवतात? कारण की तु बीज टाकले आहे म्हणून आता तु त्याचा स्वाद चाखून जा, त्याचे फळ तु चाखून जा. चाखल्याशिवाय जाऊ शकत नाही. अर्थात ते (कर्मबीज) अडवणारे आहेत. बाकी हे कर्मफळ अडवणारे नाहीत. फळ तर म्हणते की तु तुझ्या परीने खाऊन निघून जा.
प्रश्नकर्ता : पण आपण सांगितले होते की, एक टक्का जरी कर्म केले असेल तरी ते भोगावेच लागते?
दादाश्री : होय, भोगल्यानंतरच सुटका, भोगल्या शिवाय चालत नाही. कर्माचे फळ भोगत असतानाही मोक्ष होईल असा सुद्धा मार्ग असतो. परंतु कर्म बांधताना मोक्ष होत नाही. कारण की जर कर्म बांधले जात असतील तर त्याचे फळ खायला अजून रहावे लागेल ना!
प्रश्नकर्ता : आपण जे चांगले वाईट कर्म करतो. ते ह्याच जन्मात भोगायचे असते की पुढील जन्मात.
दादाश्री : लोक पाहतात की याने वाईट कर्म केले. याने चोरी केली, याने फसवणूक केली, याने धोका दिला, हे सर्व इथेच भोगायचे आणि या कर्मामुळेच आत राग-द्वेष उत्पन्न होतात. त्याचे फळ पुढील जन्मात भोगायचे.