________________
कर्माचे विज्ञान
त्याचा आधार (कारण) त्याला सापडत नाही. तो तर म्हणेल की त्यानेच मारले. हे तर त्याला उदयकर्म नाचवते. अर्थात मागे जे कर्म केले आहे, ते नाचवते त्याला.
प्रश्नकर्ता : ही जी थोबाडीत मारली ते कर्माचे फळ आहे, कर्म नाही, हे बरोबर आहे ना?
दादाश्री : होय, ते कर्म फळ आहे. म्हणजे उदयकर्म त्याच्याकडून असे करवित असते म्हणून तो दोन थोबाडीत मारतो. मग तो मार खाणारा काय म्हणतो, की 'भाऊ, अजून एक-दोन लगावून दे ना!' तेव्हा तो काय म्हणेल, 'मला काय अक्कल नाही? मूर्ख आहे का मी!' उलट रागावतो. त्याला जे मारले त्याच्यामागे कारण आहे, दोघांचा हिशोब असतो आणि त्या हिशोबाच्या बाहेर काहीच घडत नाही. अर्थात हे जग हिशोबी आहे, एक एक आणा-पईचा हिशोब आहे म्हणून घाबरण्यासारखे हे जग नाहीच, निवांतपणे झोपून जाण्यासारखे आहे. तरी सुद्धा अगदी नीडर पण होऊ नये की मला काही होणार नाही.
कर्मफळ-लोकभाषेत, ज्ञानींच्या भाषेत प्रश्नकर्ता : सर्व इथल्या इथे भोगायचे आहे असे म्हणतात, ते काय खोटे आहे का?
दादाश्री : भोगायचे इथल्या इथेच आहे पण ते या जगाच्या भाषेत. अलौकिक भाषेत याचा अर्थ काय होतो?
मागील जन्मात कर्म अहंकाराचे, मानाचे बांधलेले असेल, म्हणून या जन्मात त्याच्या सर्व बिल्डिंग बांधल्या जात असतील, तर त्यामुळे तो मानी बनतो. कशामुळे मानी बनतो? कर्माच्या हिशोबाने तो मानी बनतो. आता तो मानी झाला म्हणून त्याला जगातील लोक काय म्हणतात की, हा जो एवढा मान करतो आहे ना त्यामुळे कर्म बांधतो आहे. जगाचे लोक यास कर्म म्हणतात. परंतु भगवंताच्या भाषेत तर हे कर्माचे फळ आले आहे. फळ म्हणजे मान करायचा नसेल तरीही करावाच लागतो, होतोच.
आणि जगातील लोक ज्याला म्हणतात की हा क्रोध करतो, मान