________________
कर्माचे विज्ञान
राँग बिलीफ ने कर्मबंधन तुमचे नाव काय आहे? प्रश्नकर्ता : चंदुभाऊ. दादाश्री : खरोखर चंदुभाऊ आहात? प्रश्नकर्ता : असे कसे म्हणू शकतो? सर्वांना जे वाटते तेच खरे.
दादाश्री : तर मग खरोखर चंदुभाऊ आहात, नाही का? तुम्हाला खात्री नाही का? 'माय नेम इज (माझे नाव) चंदुभाऊ असे बोलता ना?'
प्रश्नकर्ता : मला तर खात्री आहेच.
दादाश्री : माय नेम ईज चंदूभाऊ. नॉट आय. तर खरोखर तुम्ही चंदुभाऊ आहात की दुसरे कोणी आहात?
प्रश्नकर्ता : हे खरे आहे, आपण काही वेगळेच आहोत. ही तर वास्तविकता आहे.
दादाश्री : हे 'चंदुभाऊ' तर ओळखण्याचे साधन आहे, की हे देहवाले, हे भाऊ, ते चंदुभाऊ आहेत. तुम्हीही असे जाणता की या देहाचे नाव चंदुभाऊ आहे. पण तुम्ही कोण आहात? हे जाणून घ्यायला नको?
प्रश्नकर्ता : हे जाणून घ्यायला हवे. जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
दादाश्री : म्हणजे हे कशासारखे झाले की तुम्ही चंदुभाऊ नाहीत, तरीही तुम्ही आरोप करता, चंदुभाऊच्या नावाने सगळा फायदा उठवता. ह्या स्त्रीचा पती आहे. याचा मामा आहे, याचा काका आहे, असे लाभ उठवता. त्यामुळे निरंतर कर्म बांधतच राहता. जोपर्यंत तुम्ही आरोपित भावात आहात, तोपर्यंत कर्म बांधली जातात. 'मी कोण आहे?' हे नक्की झाल्यानंतर तुम्हाला कर्म बंधन होणार नाही.
अर्थात आताही कर्म बांधली जात आहेत आणि रात्री झोपेतही कर्म बांधली जातात. कारण की 'चंदुभाऊ आहे' असे मानून झोपतात. 'मी