Book Title: Karmache Vignan
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 16
________________ कर्माचे विज्ञान ३ नाही. आणि तुमच्याच जोखिमदारीमुळे बंधन आहे. हे सर्व प्रोजेक्शन तुमचेच आहे. हा देह सुद्धा तुम्हीच घडविला आहे. तुम्हाला जे जे मिळाले ते सर्व तुम्हीच घडविलेले आहे. यात दुसऱ्या कोणाचाही हात नाही. होल अॅन्ड सोल रिस्पॉन्सिबिलिटी तुमचीच आहे सगळी, अनंत जन्मापासूनची. आपलेच 'प्रोजेक्शन' विहीरीत जाऊन प्रोजेक्ट केले, ह्यावरुन लोक असे म्हणतील की बस, प्रोजेक्ट करण्याचीच गरज आहे. आपण जर त्यांना विचारले की तुम्ही असे कशावरून म्हणता? तेव्हा म्हणतील की विहीरीत जाऊन मी आधी असे बोललो होतो की 'तु चोर आहेस.' तेव्हा विहीर मला म्हणाली की 'तु चोर आहेस.' मग मी प्रोजेक्ट बदलले की, तु 'राजा आहेस.' तर तिने पण म्हटले 'तु राजा आहेस.' अरे पण, हा प्रोजेक्ट तुझ्या हातात आहेच कुठे? प्रोजेक्टला बदलणे ही गोष्ट तर खरी आहे, परंतु तेही तुझ्या हातात नाही. हो, ते स्वतंत्र आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. 'नाही' हे जास्त प्रमाणात आहे आणि 'आहे' हे कमी प्रमाणात आहे. असे हे परसत्तावाले जग आहे. खरे ज्ञान समजल्यानंतर स्वतंत्र आहे, तोपर्यंत स्वतंत्र नाही. पण मग आता प्रोजेक्ट बंद कसे होईल? तर ह्यातून जोपर्यंत स्वत:चे स्वरूप सापडत नाही. अर्थात ह्या सर्वांत 'मी हे आहे की ते आहे?' तोपर्यंत भटकणे आहे. हा देह तर मी नाही. हे डोळे सुद्धा मी नाही. आत खूप सारे स्पेअरपार्टस (अवयव) आहेत. या सगळयात 'मी चंदुभाऊ आहे' (चंदुभाऊच्या जागी वाचकांनी स्वत:चे नाव समजायचे) असे अजून भान आहे. त्यामुळे हे सार काढू शकत नाही, म्हणून तो काय समजतो? हा त्याग करतो? तोच 'मी' आहे. त्यामुळे खरे तर, 'मी' कुठेही योग्य स्थानावर उभा राहिला नाही त्यांना. तो समजतो की हा तप करतो तोच 'मी' आहे. सामायिक करतो तोच मी आहे, प्रवचन देतो तोच 'मी' आहे. जोपर्यंत 'मी करत आहे' असे भान आहे तोपर्यंत नवीन प्रोजेक्ट करत राहतो. आणि जुन्या प्रोजेक्टअनुसार भोगत राहतो. कर्माचा सिद्धांत जर समजत असाल, तरच मोक्षाचा सिद्धांत समजेल.

Loading...

Page Navigation
1 ... 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94