Book Title: Karmache Vignan
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 25
________________ १२ कर्माचे विज्ञान लहान मुलाला कडू औषध पाजले तेव्हा काय करतो? तोंड बिघडवतो ना! आणि गोड खायला दिले तर? खुश होतो. या जगात जीवमात्र राग-द्वेष करतात, हे सर्व कॉझ (कारणे) आहे, यातून हे कर्म उत्पन्न झाले आहे. जे स्वत:ला आवडते ते व जे स्वत:ला आवडत नाही ते, ही दोन्ही प्रकारची कर्म येतात. न आवडणारे कर्म चावून जातात, म्हणजे दुःख देऊन जातात. आणि आवडणारे कर्म सुख देऊन जातात. म्हणजे कॉझीझ मागच्या जन्मात झालेले आहे, ते या जन्मात फळ देतात. कर्मबीजाचे नियम प्रश्नकर्ता : कर्म बीजाची अशी काही समज आहे की हे बीज पडेल आणि हे पडणार नाही? दादाश्री : हो, जर तुम्ही म्हणालात की, 'हा नाष्टा किती छान बनला आहे, तो 'मी खाल्ला.' तर बीज पडले. 'मी खाल्ले' बोलण्यात अडचण नाही. 'कोण खातो', ते तुम्ही जाणले पाहिजे की मी खात नाही, खाणारा खात आहे. पण हा तर स्वतः कर्ता बनतो आणि कर्ता बनल्यामुळेच बीज पडते. कोणी शिव्या दिल्या तरी त्याच्यावर द्वेष नाही, फूल वाहिले किंवा उचलून घेतले तर त्याच्यावर राग (आसक्ति, मोह) नाही. तर त्याला कर्म बांधले जात नाही. प्रश्नकर्ता : राग-द्वेष होतो परंतु समजत नाही, तर त्यावर काय उपाय? दादाश्री : त्याचे त्याला असे बक्षिस मिळते की त्यामुळे पुढील जन्मांत त्याचे भटकणे चालूच राहते. संबंध, देह आणि आत्म्याचा... प्रश्नकर्ता : देह आणि आत्मा यांच्यातील संबंधाबाबत जास्त विस्तारपूर्वक समजवा ना? दादाश्री : हा जो देह आहे, तो आत्म्याच्या अज्ञानतेने उत्पन्न झालेला परिणाम आहे. जे जे 'कॉझीझ' केले होते, त्याचा हा 'इफेक्ट' (परिणाम) आहे. जर कोणी तुम्हाला फूल वाहिले तर तुम्ही खुश होता, आणि जर कोणी

Loading...

Page Navigation
1 ... 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94