________________
कर्माचे विज्ञान
तुम्हाला शिवी दिली तर तुम्ही चिडता. त्या चिडण्यात आणि खुश होण्यात बाह्य दर्शनाची किंमत नाही. अंतर - भावाने कर्म चार्ज होतात. ते मग पुढील जन्मात डिस्चार्ज (पूर्वी बांधलेले कर्म उदयास येतात) होतात. त्यावेळी ते 'इफेक्टिव' आहे. हे मन-वचन - काया तिन्ही 'इफेक्टिव' आहेत. 'इफेक्ट' भोगताना दूसरे नवीन कॉझीझ उत्पन्न होतात. जे पुढील जन्मात परत 'इफेक्टिव' होतात. अशाप्रकारे 'कॉझीझ' आणि 'इफेक्ट', 'इफेक्ट' आणि 'कॉझीझ' असे चक्र निरंतर चालूच राहते. म्हणून फॉरीनच्या सायन्टिस्ट लोकांनाही समजते की, अशाप्रकारे पुनर्जन्म आहे. म्हणून खूप खुश होतात की इफेक्ट एन्ड कॉझीझ आहेत हे !
१३
तर हे सर्व इफेक्ट आहेत. तुम्ही वकीली करता ते सर्व इफेक्ट आहे. इफेक्टमध्ये अहंकार करू नये की 'मी केले. ' इफेक्ट तर आपोआपच येतो. हे पाणी खाली जाते, तेव्हा ते असे म्हणत नाही की 'मी जात आहे', ते समुद्राकडे चारशे मैल असे तसे वळून जातच असते ना! आणि मनुष्य तर एखाद्याची केस जिंकून दिली तर 'मी कशी जिंकून दिली' असे बोलतो. आता त्याने त्याचा अहंकार केला, त्यामुळे त्याचे कर्म बांधले गेले, कॉझ झाले. त्याचे फळ पुन्हा इफेक्टमध्ये येईल.
कारण-कार्याचे रहस्य
इफेक्ट तुम्हाला समजले का ? आपणहून येतच असतात त्याचे नाव इफेक्ट. आपण परीक्षा देतो ना, हे कॉझ म्हटले जाईल. नंतर त्याच्या परिणामाची चिंता आपण करायची नसते. तो तर इफेक्ट आहे. परंतु संपूर्ण जग परिणामाची चिंता करत असते. खरं तर कॉझसाठी चिंता करण्यासारखे आहे!
हे विज्ञान तुला समजले का ? विज्ञान सिद्धांतिक असते. अविरोधाभास असते. तु बिझनेस केला व दोन लाख कमवले, तर ते कॉझ आहे की इफेक्ट?
प्रश्नकर्ता: कॉझीझ आहे.
दादाश्री : कशाप्रकारे कॉझीझ आहे ते मला समजवून सांग. मनासारखे करू शकतो का ?