________________
६
कर्माचे विज्ञान
ईश्वर कर्ता नाही. कर्माची फळे प्रत्येकाला भोगावी लागतात. तर ही कर्माची फळे जन्मोजन्मी अशीच चालू राहतात का?
दादाश्री : हो तर. नक्कीच. कर्माचे असे आहे की, या कैरीमधून झाड आणि झाडातून कैरी, परत कैरीमधून झाड आणि झाडातून कैरी.
प्रश्नकर्ता : हा तर उत्क्रांतीचा नियम झाला, हे तर होतच राहणार.
दादाश्री : नाही, हेच कर्म फळ, ही कैरी फळ रुपात आली. त्या फळामधून बी पडते आणि पुन्हा झाड होते आणि झाडामधून पुन्हा फळ येते ना! हे चालतच राहील. कर्मातून कर्मबीज पडतच राहते.
प्रश्नकर्ता : तर मग हे शुभ-अशुभ कर्म बंधन होतच राहणार, सुटणारच नाही.
दादाश्री : हो, वरचा गर खाऊन घेतो आणि कोय परत टाकली जाते. प्रश्नकर्ता : त्याने तर तिथे पुन्हा आंब्याचे झाड उत्पन्न होईल. दादाश्री : सुटकाच नाहीना!
जर तुम्ही एकीकडे ईश्वराला कर्ता मानता तर मग, दुसरीकडे तुम्ही स्वत:ला सुद्धा कर्ता का मानता? हा तर पुन्हा स्वत:ला च कर्ता मानतो! मनुष्य एकटाच असा आहे की, जो 'मी कर्ता आहे' असे भान ठेवतो. आणि जेथे कर्ता झाला तेथे आश्रितता तुटून जाते. त्याला भगवंत म्हणतात की, 'भाऊ, तूच करतोस तर, तु वेगळा आणि मी वेगळा.' मग भगवतांचे आणि तुमचे काय देणे-घेणे आहे?
स्वत:ला कर्ता मानतो म्हणून कर्मबंधन होते. स्वत:ला जर त्या कर्माचा कर्ता मानले नाही तर त्या कर्माचा विलय होतो.
हे आहे महाभजनाचे मर्म म्हणून अखा भगत म्हणतात की,
जो तु जीव तो कर्ता हरी; जो तु शीव तो वस्तु खरी!