Book Title: Pure Love Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 8
________________ संपादकीय प्रेम हा शब्द इतका चुरगळला गेला आहे की आपल्याला पावलोपावली असा प्रश्न पडतो की याला काय प्रेम म्हणायचे? प्रेम असेल तिथे असे असू शकते का? खरे प्रेम कुठे मिळेल? खरे प्रेम कशास म्हणावे? प्रेमाची यथार्थ व्याख्या तर प्रेममूर्ती ज्ञानीच देऊ शकतात. जे कधी वाढत नाही आणि कमी होत नाही तेच खरे प्रेम. जे वाढत जाते आणि नंतर कमी होते ते प्रेम नव्हे, ती आसक्ती आहे. ज्यात काही अपेक्षा नाही, स्वार्थ नाही, मतलब नाही, की दोषदृष्टी नाही, निरंतर एकसमान वाहतच राहते, फुले वाहिली तरी उफाडा येणार नाही आणि शिव्या दिल्या तरी अभाव होणार नाही, असे अघट-अपार प्रेम तेच साक्षात परमात्म प्रेम आहे. अशा अनुपम प्रेमाचे दर्शन तर ज्ञानी पुरुषात किंवा संपूर्ण वीतराग भगवंतातच होते. आपले लोक तर मोहालाही प्रेम समजतात! मोहात मोबदल्याची अपेक्षा असते. अपेक्षा पूर्ण झाली नाही की आत कोलाहल माजतो. त्यावरुन कळते की ते शुद्ध प्रेम नव्हते. प्रेमात तर सिन्सियारिटी असते संकुचितता नसते. व्यवहारात आईचे प्रेम उच्च दर्जाचे मानले आहे. पण तरीही त्यात कुठे ना कुठे अपेक्षा आणि अभाव दिसतोच. आणि मोह असल्यामुळे ती आसक्तीच म्हटली जाईल. मुलगा बारावीत ९० टक्के मिळवून पास झाला तर आई-वडील खुश होतात, पार्टी देतात व मुलाचे कौतुक करताना थकतही नाहीत. त्याला स्कूटर आणून देतात. तोच मुलगा चार दिवसानंतर स्कुटर ठोकून आला, स्कूटरची फार वाट लावली तर तेच आई-वडिल त्याला काय म्हणतात? 'तुला अक्कलच नाही, मूर्ख आहेस आता तुला काहीच मिळणार नाही.' चारच दिवसात त्याच्या हुशारीचे सर्टिफिकेट परत घेतले. सगळे प्रेम ओसरले! याला काय प्रेम म्हणायचे? व्यवहारात सुद्धा मुले असो नोकर असो किंवा कोणीही असो, सगळे प्रेमानेच वश होतात. इतर शस्त्र तिथे निर्रथक ठरतात.

Loading...

Page Navigation
1 ... 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76