________________
लोक आमच्या प्रेमामुळेच जगत आहेत. निरंतर दादा, दादा, दादा! खाण्यास नाही मिळाले तरी हरकत नाही. म्हणजे प्रेम ही अशी वस्तू आहे.
आता या प्रेमानेच त्यांची पापं भस्मसात होतात. नाही तर ही कलियुगातील पापं कशी धुतली जातील?
तरी राहिला फरक चतुर्दशी आणि पौर्णिमेत म्हणजे जगात कधीही पाहिले नसेल, तसे प्रेम उत्पन्न झाले आहे. कारण प्रेम उत्पन्न झाले होते, पण तिथे ते वीतराग झाले होते. जिथे प्रेम उत्पन्न होईल अशी जागा होती, तिथे ते संपूर्ण वीतराग होते. म्हणून तिथे प्रेम दिसत नव्हते. आम्ही कच्चे पडलो म्हणून प्रेम राहिले पण संपूर्ण वीतरागता आली नाही.
प्रश्नकर्ता : आपण म्हणालात ना की आम्ही प्रेम स्वरूप झालो पण तेव्हा संपूर्ण वीतरागता उत्पन्न झाली नाही. हे जरा समजायचे होते.
दादाश्री : प्रेम म्हणजे काय? तर कोणाबद्दल किंचितमात्रही भाव बिघडत नाही, त्याचे नाव प्रेम. संपूर्ण वीतरागता म्हणजेच प्रेम.
प्रश्नकर्ता : तर प्रेमाचे स्थान नक्की कुठे आहे ? इथे कोणत्या स्थितीत प्रेम म्हटले जाईल?
दादाश्री : प्रेम तर, जितके वीतराग झालात तितके प्रेम उत्पन्न झाले. संपूर्ण वीतराग म्हणजे संपूर्ण प्रेम! म्हणजे वितद्वेष तर तुम्ही सर्व झालातच. आता प्रत्येक बाबतीत हळूहळू वीतराग होत जाल तसतसे प्रेम उत्पन्न होत राहिल.
प्रश्नकर्ता : तर इथे आपण म्हणालात की आमचे प्रेम म्हटले जाते, पण वीतरागता नाही आली, म्हणजे काय?
दादाश्री : वीतरागता म्हणजे आमचे प्रेम आहे, ते असे दिसून येते आणि या वितारागांचे प्रेम असे दिसत नाही. परंतु खरे प्रेम तर त्यांचेच म्हटले जाते आणि आमचे प्रेम लोकांना दिसते. परंतु ते खरे प्रेम म्हटले जात नाही. एक्जक्टली (खरोखर) ज्याला प्रेम म्हटले जाते ना, ते म्हणता