________________
आता नि:स्पृह प्रेम असते, पण ते अहंकारी पुरुषाला असते. म्हणून आत अहंकार शोषून घेतो की नाही? घेतोच. म्हणजे त्यात तो संपूर्ण नि:स्पृह राहू शकत नाही. अहंकार गेल्यानंतर खरे प्रेम असते. ___म्हणजे हा प्रेमावतार आहे. तेव्हा कोणाच्याही मनात जरासाही गोंधळ निर्माण झाला की तिथे ते स्वतः येऊन हजर!
प्रेम, सर्वांवर सारखेच हे प्रेम तर ईश्वरीय प्रेम आहे. असे सगळीकडे नसते ना! हे तर क्वचित ठिकाणी असे असेल तरच असते, नाही तर शक्यच नाही ना!
__ आम्हाला तर शरीराने जाड दिसतो त्याच्यावर सुद्धा प्रेम, गोरा दिसतो त्याच्यावरही प्रेम, काळा दिसतो त्याच्यावरही प्रेम, लुळा-पांगळा दिसतो त्याच्या वरही प्रेम, सुदृढ मनुष्य असेल त्याच्यावरही प्रेम, सर्वांवर सारखेच प्रेम दिसते. कारण आम्ही त्याच्या आत्म्यालाच पाहतो. दुसरी वस्तू पाहतच नाही. जसे संसारात लोक मनुष्याचे कपडे पाहत नाहीत, त्याचे गुण कसे आहेत ते पाहतात. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष या पद्गलला पाहत नाही, पुद्गल तर कोणाचे अधिक असते, तर कोणाचे कमी असते. याचा काही नेम नाही ना!
आणि असे प्रेम असेल तिथे लहान मुले सुद्धा बसून राहतात. अशिक्षित बसून राहतात. शिक्षित बसून राहतात. बुद्धिवान बसून राहतात. सर्व लोक सामावले जातात. मुले तर इथून उठतच नाहीत, कारण वातावरणच इतके सुंदर असते.
असे प्रेम स्वरूप 'ज्ञानी'चे म्हणजे प्रेम तर 'ज्ञानी' पुरुषाचेच पाहण्यासारखे आहे! आज पन्नास हजार लोक बसले आहेत परंतु कोणताही मनुष्य सहजही प्रेम रहित झाला नसेल. त्या प्रेमानेच जगत आहेत सर्व.
प्रश्नकर्ता : हे तर फार कठीण आहे. दादाश्री : परंतु आमच्यात तसे प्रेम प्रकट झाले आहे. तेव्हा बरेच