________________
शुद्ध प्रेम स्वरूप, तोच परमात्मा अहंकारी व्यक्तीला खुश करायला वेळच लागत नाही. गोड-गोड बोलाल तरीही खुश होऊन जातो आणि ज्ञानी तर गोड बोलाल तरी खुश होत नाहीत. कोणतेही साधन, जगात अशी कोणतीही वस्तू नाही की ज्यामुळे 'ज्ञानी' खुश होतील. फक्त आपल्या प्रेमानेच खुश होतील. कारण ते एकटेच प्रेमवाले आहेत. त्यांच्याजवळ प्रेमाशिवाय दुसरे काही नाहीच. संपूर्ण जगासाठी त्यांना प्रेम आहे.
__ज्ञानी पुरुषांचे शुद्ध प्रेम जे दिसते, असे उघड-उघड दिसते, तोच परमात्मा. परमात्मा, ही दुसरी कोणती वस्तूच नाही. शुद्ध प्रेम जे दिसते, जे वाढत नाही, घटत नाही, एकसमानच राहते, त्याचेच नाव परमात्मा, उघड-उघड परमात्मा! आणि ज्ञान हा सूक्ष्म परमात्मा आहे, ज्ञान समजण्यास वेळ लागेल. म्हणून परमात्मा शोधण्यासाठी बाहेर जायचे नाही. बाहेर तर सर्व आसक्ती आहे.
-जय सच्चिदानंद