________________
येणार नाही, एक्जॅक्टली तर संपूर्ण वीतरागता असेल तेव्हा खरे प्रेम, आणि आमचे तर अजून चतुर्दशी म्हटली जाते. पौर्णिमा नाही!!
प्रश्नकर्ता : म्हणजे पौर्णिमावाल्याचे प्रेम यापेक्षाही अधिक असते?
दादाश्री : पौर्णिमावाल्याचेच खरे प्रेम! चतुर्दशीवाल्यामध्ये काही ठिकाणी कमतरता असते. तेव्हा पौर्णिमावाल्याचेच खरे प्रेम असते.
प्रश्नकर्ता : संपूर्ण वीतरागता असेल आणि बिनप्रेमाचा असेल, असे तर शक्यच नाही ना?
दादाश्री : ते बिनप्रेमाचे नसतातच ना!
प्रश्नकर्ता : म्हणजे दादा चतुर्दशी आणि पौर्णिमेत एवढा फरक असतो? एवढा सारा फरक?
दादाश्री : बराच फरक! हे तर आपल्याला पौर्णिमेसारखे वाटते परंतु बराच फरक आहे! आमच्या हातात आहे तरी काय? आणि त्यांच्या, तीर्थंकरांच्या हातात तर सर्व काही आहे. आमच्या हातात काय आहे !! पण तरीही आम्हाला पौर्णिमेसारखे समाधान वाटते! आमची शक्ती, स्वतःसाठी इतके काम करीत असते की आम्हाला पौर्णिमा झाल्यासारखेच वाटते!!
ज्ञानी बांधले गेले प्रेमाने प्रश्नकर्ता : आता हे ज्ञान घेतल्यानंतर दोन तीन जन्म बाकी राहतील तर तितक्या काळापर्यंत तर संपूर्ण करुणा-सहाय्य करण्याकरिता तुम्ही बांधलेले आहातच ना?
दादाश्री : बांधलेले आहोत म्हणजे आम्ही प्रेमाने बांधलेले आहोत. तुम्ही जोपर्यंत प्रेम ठेवाल तोपर्यंत आम्ही बांधलेले आहोत. तुमचे प्रेम सुटले की आम्ही सुटलो. आम्ही प्रेमाने बांधलेलो आहोत.तुमचे प्रेम संसाराकडे वळले तर तुम्ही आमच्यापासून वेगळे व्हाल आणि जर आत्म्यासाठी प्रेम राहिले तर आम्ही बांधलेले आहोत. काय वाटते? बांधलेले तर आहोतच ना! प्रेमाने तर बांधलेलेच आहोत ना!