________________
६२
बंधन होत नाही. कारण या रागात संसारी हेतू नाही. उपकार करणाऱ्यावर राग उत्पन्न होतो, तो प्रशस्त राग, तो सर्व रागांना सोडवणारा आहे.
या 'दादांचे' निदिध्यासन केले तर त्यांच्यात जे गुण आहेत ते आपल्यात उत्पन्न होतात. दुसरे असे की जगातील कोणत्याही वस्तूची स्पृहा करू नये. भौतिक वस्तूची स्पृहा करू नये. आत्म सुखाचीच कामना करायची. दुसरी कोणतीही कामना करू नये. आणि ज्याने तुम्हाला शिव्या दिल्या असतील त्याच्यावरही प्रेम. इतके असेल तर मग कामच झाले.
ज्ञानी बेजोड प्रेमावतार प्रश्नकर्ता : कित्येक वेळा असे होते की झोपलेले असतो आणि थोडी अर्धजागृत अवस्थाही असते आणि 'दादा' आत शिरतात. 'दादां'चेच सुरु होऊन जाते, ते काय आहे?
दादाश्री : हो, सुरु होऊन जाते. असे आहे ना, 'दादा' सूक्ष्म भावे संपूर्ण जगात फिरत असतात. मी स्थूलभावे इथे असतो आणि दादा सूक्ष्मभावे साऱ्या जगात फिरत असतात. सगळीकडेच लक्ष ठेवतात. आणि असे नाही की कोणाबरोबर काही भानगड आहे.
म्हणून पुष्कळ लोकांच्या स्वप्नात येतच असतात, आपोआपच. कित्येक तर दिवसासुद्धा 'दादांशी' वार्तालाप करतात. ते मग मला सांगतात ही की दादा तुम्ही माझ्याशी असा वार्तालाप केला! दिवसा, उघड्या डोळ्यांनी त्याला दादा सांगतात आणि तो ऐकतो आणि लिहूनही घेतो. आठ वाजता लिहून घेतो की दादा इतके बोलले आहेत. ते मग मला वाचून सुद्धा दाखवतात.
म्हणजे असे सर्व घडतच असते. पण तरी यात चमत्कारासारखे काहीच नाही. हे स्वाभाविक आहे. कोणत्याही मनुष्याची आवरणरहित स्थिती झाली असेल आणि थोडे फार केवळ ज्ञानास अंतराय करतील इतके आवरण राहिले असेल आणि जगात ज्याचे उदाहरण सापडणार नाही असे प्रेम उत्पन्न झाले असेल, ज्याचे उदाहरण सापडणार नाही असा अद्वितीय प्रेमावातर झाला असेल, तिथे सर्व काही घडते.