Book Title: Pure Love Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 70
________________ प्रेम प्रकटविते आत्म ऐश्वर्य करुणा हा सामान्य भाव आहे आणि तो सर्वत्र वर्तत असतो की सांसारिक दुःखांमुळे हे जग फसलेले आहे आणि ती दु:खं दूर कशी होतील? प्रश्नकर्ता : मला जरा प्रेम आणि करुणेचा काय संबंध आहे हे समजायचे आहे. दादाश्री : करुणा, काही खास दृष्टीने असेल तेव्हा करुणा म्हटली जाते. आणि दुसऱ्या कुठल्या दृष्टीने असेल तेव्हा प्रेम म्हटले जाते. करुणेचा उपयोग केव्हा करतात? सामान्य भावे सर्वांचे दुःख स्वतः पाहू शकतो, तिथे करुणा असते. करुणा म्हणजे काय? तर ती एक प्रकारची कृपा आहे आणि प्रेम ही वेगळी वस्तू आहे. प्रेमास तर विटामिन म्हटले जाते. असे प्रेम पाहिले की त्याच्यात विटामिन उत्पन्न होते, आत्मविटामिन. देहाचे विटामिन तर पुष्कळ दिवस खाल्ले, परंतु आत्म्याचे विटामिन चाखले नाही ना? त्याच्यात आत्मवीर्य प्रकट होते. ऐश्वर्य पण प्रकट होते. प्रश्नकर्ता : हे सहजच होते ना दादा? दादाश्री : सहजच. प्रश्नकर्ता : म्हणजे त्यासाठी त्याला काहीच करावे लागत नाही. दादाश्री : काहीच नाही. हा मार्गच सहज आहे. शिव्या देणाऱ्यावरही प्रेम! प्रश्नकर्ता : या ज्ञानानंतर आम्हाला जो अनुभव होतो, त्यात असे प्रेम, प्रेम आणि प्रेमच उफाळत असते, ते काय आहे? दादाश्री : तो प्रशस्त राग आहे, या रागामुळे संसारातील सर्व राग (मोह) सुटतात. असा राग उत्पन्न होतो तेव्हा संसारात इतर जागी जिथे जिथेही राग पसरलेले आहेत ते सर्व परततात. यास भगवंताने प्रशस्त राग म्हटले आहे. प्रशस्त राग, हे प्रत्यक्ष मोक्षाचे कारण आहे. या रागामुळे

Loading...

Page Navigation
1 ... 68 69 70 71 72 73 74 75 76