Book Title: Pure Love Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 68
________________ प्रेम ५९ प्रश्नकर्ता : खरोखर तुम्ही काहीच करत नाही ? कोणी महात्मा दुःखात असेल तर तुम्ही काहीच करत नाही का ? दादाश्री : करतो ना! परंतु ते 'सुपरफ्लुअस' आत शिवू देत नाही. बाहेरच्या भागाचे सर्वच पूर्ण करून घेतो. बाहेरच्या भागात सर्व प्रयोग पूर्ण होऊ द्यायचे. पण चिंता मात्र करायची नाही. चिंतेमुळे तर सर्व बिघडते. तुम्ही काय म्हणता ? मी चिंता करावी असे म्हणायचे आहे का तुम्हाला ? शिवू दिले तर ते काम होणारच नाही. जगात सर्वांनाच शिवत असते ना! आत शिवते म्हणून तर जगाचे काम होत नाही. आम्ही आत शिवू देत नाही म्हणून काम होते. शिवू देत नाही म्हणूनच आमचीही सेफसाईड आणि त्याची सुद्धा सेफसाईड, शिवायला द्यायचे नाही हे तुम्हाला आवडले का ? तुम्ही तर शिवू दिलेले, नाही का ? आम्ही तर हिशोब पाहून घेतला की आम्ही शिवू दिले तर इथे निर्वीर्य होईल आणि त्याचे काम होणार नाही. आणि जर शिवू दिले नाही, तर आत्मवीर्य प्रकट होईल आणि त्याचे काम होईल. हे विज्ञान प्रेमस्वरूप आहे, प्रेमात क्रोध - मान-माया - लोभ वगैरे काहीही नसते. ते असेपर्यंत प्रेम नसते. सात्विक नाही, शुद्ध प्रेम आहे 'हे' प्रश्नकर्ता : आजकाल जगात सर्वच शुद्ध प्रेमासाठी तळमळत असतात. दादाश्री : शुद्ध प्रेमाचाच हा मार्ग आहे. आपले जे विज्ञान आहे ना, त्यात कुठलीही, कोणत्याही प्रकारची इच्छा नाही, म्हणजे शुद्ध प्रेमाचा हा मार्ग इथे उद्भवला आहे. नाही तर या काळात हे शक्यच नाही. परंतु या काळात उत्पन्न झाला, ते एक आश्चर्यच घडले आहे. प्रश्नकर्ता : शुद्ध प्रेम आणि सात्विक प्रेमातला फरक समजवा ना. दादाश्री : सात्विक प्रेम अहंकार सहित असते आणि शुद्ध प्रेमात

Loading...

Page Navigation
1 ... 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76