________________
५८
प्रेम
प्रश्नकर्ता : पण तरी तो जिव्हाळा तुम्हाला टच होत नाही.
दादाश्री : जिथे नैसर्गिक रित्या ठेवायला हवे तिथेच आम्ही त्यास ठेवतो आणि तुम्ही अनैसर्गिक ठिकाणी ठेवता.
प्रश्नकर्ता : ही डिमार्केशन जरा स्पष्ट करा ना ?
दादाश्री : 'फॉरेन' ची गोष्ट फॉरेनमध्येच ठेवायची ना, 'होम' मध्ये आणायची नाही. लोक 'होम' मध्ये आणतात. 'फॉरेन'ची गोष्ट फॉरेनमध्ये ठेऊन स्वतः 'होम'मध्ये शिरायचे.
प्रश्नकर्ता : पण मग जेव्हा त्या जिव्हाळ्याचा प्रवाह असतो तेव्हा 'त्याला' 'फॉरेन' आणि 'होमचे' (आत्मा आणि अनात्म्याचे) डिमार्केशन होऊ देत नाही ना? त्याक्षणी दोन भाग वेगळे पडत नाहीत ना?
दादाश्री : ज्यांनी ‘ज्ञान' घेतले असेल, त्यांना का वेगळे करता येणार नाही.
प्रश्नकर्ता : आपण हे कशाप्रकारे 'अप्लाय' करता. ते मला समजायचे आहे.
दादाश्री : आम्ही जिव्हाळ्यास 'फॉरेन' मध्ये ठेऊन ‘होम' मध्ये (आत्म्यात) शिरतो आणि तो जिव्हाळा जर आत घुसत असेल तर त्यास म्हणतो, 'बाहेर बस.' आणि तुम्ही तर म्हणाल 'ये, भाऊ, ये, ये, आत ये,'
'आत शिवू देत नाही,' याचा परिणाम...
आम्हाला हे सगळे जण म्हणतात की 'दादा' तुम्ही आमची खूप चिंता करता, नाही का ? बरोबर आहे. पण त्यांना हे माहीत नाही की दादा चिंतेला शिवूही देत नाहीत. कारण चिंता करणारा मनुष्य काहीच करू शकत नाही. निर्वीर्य होऊन जातो. चिंता करत नसाल, तर सर्व काही करू शकता. चिंता करणारा मनुष्य तर संपूनच जातो. तेव्हा हे सर्व म्हणतात, ती गोष्ट खरी आहे. आम्ही सुपरफ्लुअस ( वरवर ) सर्व काही करतो पण आत शिवू देत नाही.