________________
प्रेम
म्हणायचे की जे कधी तुटत नाही. हीच तर प्रेमाची कसोटी आहे. पण तरी थोडेफार प्रेम आहे ते म्हणजे आईचे प्रेम.
प्रश्नकर्ता : आपण असे म्हणालात की, आईचे प्रेम असू शकते, वडिलांचे नाही. तर यांना वाईट नाही का वाटणार ?
दादाश्री : पण तरी आईचे प्रेम आहे. याची खात्री पटते. आई मुलाला पाहताच खुश. याचे काय कारण? तर मुलाने आपल्या घरातच, आपल्या शरीरातच नऊ महिने मुक्काम केला होता. त्यामुळे आईला असे वाटते की हा माझ्या पोटी जन्मला आहे आणि त्या मुलालाही असे वाटते की, मी आईच्या पोटी जन्मलो. म्हणून इतकी एकता झाली आहे. आईने जे खाल्ले त्याचेच रक्त बनते. म्हणजे हे एकतेचे प्रेम आहे. पण तरी सुद्धा वास्तविक, 'रियली स्पिकिंग' प्रेम नाही. 'रिलेटिव्हली स्पिकिंग' प्रेम आहे. त्यामुळे प्रेम जर कुठे असेल तर ते फक्त आई वरच. तिथे प्रेमाची काही तरी निशाणी दिसते. ते देखील पौद्गलिक (शारीरिक) प्रेम आहे, आणि प्रेम पण केवढ्या भागात ? तर एखादी वस्तू आईला आवडत असेल आणि त्या वस्तूवर मुलाने हक्क बजावला तर ते दोघेही भांडतात, तेव्हा प्रेम फ्रॅक्चर होते. मुलगा वेगळा राहायला जातो. म्हणेल, 'आई, तुझ्याशी जमणार नाही.'
हे रिलेटिव्ह नाते आहे. रियल नाते नाही. खरे प्रेम असेल ना, तर वडील मेल्यावर वीस वर्षाचा मुलगा सुद्धा त्यांच्यासोबत जाईल. त्यास प्रेम म्हणतात. एक तरी मुलगा सोबत जातो का ?
प्रश्नकर्ता : कोणीही गेला नाही.
दादाश्री : अपवाद नाही का कोणी ? जेव्हा वडील मरतात तेव्हा मुलगा, ‘माझे वडील गेले, माझे वडील गेले, ' याचा एवढा परिणाम होतो की तो देखील वडिलांसोबत मरण्यास तयार होतो. अशी घटना मुंबईत घडली आहे का कधी ?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : मग तिथे स्मशानात जाऊन काय करतात ?