________________
असते. जग आसक्तीनेच बांधले गेले आहे. जगात कुठेही प्रेम असू शकत नाही.
प्रश्नकर्ता : वडिलांसाठी हे मान्य आहे, पण आईच्या बाबतीत सुद्धा असे असते हे अजूनही मला पटत नाही.
दादाश्री : असे आहे की, वडील स्वार्थी असतात, परंतु आई मुलांच्या बाबतीत स्वार्थी नसते. म्हणजे इतका फरक असतो. आईला काय असते? तर फक्त आसक्तीच! मोह !! बाकी सर्व विसरून जाते, भान विसरून जाते. त्यात क्षणभरही निष्काम होऊ शकत नाही, मनुष्य निष्काम होऊच शकत नाही. 'ज्ञानी' शिवाय इतर कोणी निष्काम होऊच शकत नाही, आणि हे जे सर्व निष्काम होऊन फिरतात ना, ते जगाचा फायदा घेतात. निष्कामचा (खरा) अर्थ तर असायला हवा ना?
रागावल्यावर कळते? प्रश्नकर्ता : आई-वडिलांचे जे प्रेम आहे, ते कसे म्हटले जाते?
दादाश्री : एखाद्या दिवशी मुलाने जर आई-वडिलांना शिव्या दिल्या ना, की मग ते दोघेही मुलाशी भांडतात. हे 'संसारी' प्रेम टिकतच नाही ना. पाच वर्षाने, दहा वर्षाने कधी ना कधी ओसरते. परस्पर प्रेम असायला हवे. कमी-जास्त होणार नाही असे प्रेम असायला हवे.
तरी सुद्धा वडील कधी तरी मुलांवर रागावतात, पण त्यात हिंसक भाव नसतो.
प्रश्नकर्ता : खरोखर तर ते प्रेमच आहे.
दादाश्री : ते प्रेम नाहीच. प्रेम असेल तर राग येतच नाही. पण त्यामागे हिंसकभाव नाही, म्हणून त्यास क्रोध म्हणत नाही. क्रोध हिंसकभावासहित असतो.
व्यवहारात आईचे प्रेम उत्कृष्ट खरे प्रेम तर कोणत्याही परिस्थितीत तुटायला नको. प्रेम त्यास