Book Title: Pure Love Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 31
________________ २२ नाही? खरे गुरु आणि शिष्यामध्ये तर प्रेमाचे बंधन इतके सुंदर असते की, गुरु जे काही बोलतात ते शिष्याला खूपच आवडते. असा तर त्यांच्या प्रेमाचा बंध असतो. परंतु आजकाल तर या दोघांतही भांडणे होत असतात. एका ठिकाणी तर शिष्य आणि गुरु महाराज दोघेही मारामारी करत होते. तेव्हा एका माणसाने मला सांगितले, 'चला वर' मी म्हटले 'अरे बाबा, असे पाहू नये' वाईट दिसते. असे तर चालायचेच. जग असेच आहे. सासू-सून नाही का भांडत? तसेच हे सुद्धा आहे. वैर बांधलेले, ते वैर पूर्ण होत असते. वैर बांधले गेले असते. हे जग जर प्रेमाचे असते तर सबंध दिवस त्यांच्याजवळून उठावेसे वाटणार नाही. लाख रुपयांची कमाई होत असेल तरी म्हणेल जाऊ द्या ना! आणि हा बापडा तर काही कमाई होत नसेल तरी बाहेर निघून जातो! बाहेर का निघून जातो? कारण त्याला घरात आवडत नाही, चैन पडत नाही! पती? नाही, 'कम्पेनियन' या सर्व 'रॉग बिलिफ्स (चुकीच्या मान्यता)' आहेत. 'मी चंदुभाई आहे.' ही राँग बिलिफ आहे. मग घरी गेल्यावर आपण त्याला विचारू 'हे कोण?' तेव्हा म्हणेल, 'मला नाही ओळखले' मी हिचा मालक (पती). ओहोहो... मोठे आले मालक! जणू या मालकाचा कोणी मालकच नसेल अशी गोष्ट करतो ना? या मालकाचाही कोणीतरी मालक तर असेलच ना! मग त्या वरच्या मालकाची आपण पत्नी झालो आणि आपली पत्नी ही झाली. हे कसल्या भानगडीत पडलात? मालक व्हायचेच कशाला? माझे 'कम्पेनियन' (जोडीदार) आहे असेच म्हणावे, मग काय हरकत आहे? प्रश्नकर्ता : दादाजी ही तर आपण खूप 'मॉडर्न' भाषा वापरली. दादाश्री : मग काय? टसल (संघर्ष) कमी होईल ना! हो, एकाच खोलीत 'कम्पेनियन' आणि ते, दोघे राहत असतील, तर त्यातली एक व्यक्ती चहा बनवेल तर दुसरी व्यक्ती चहा पिणार, मग दुसरी व्यक्ती त्याच्यासाठी दुसरे काही काम करेल. असे करत 'कम्पेनियनशीप' चालत राहील.

Loading...

Page Navigation
1 ... 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76