________________
पत्नीमध्ये संघर्ष कमी होत असतील तिथे आसक्ती कमी आहे असे समजावे. समजेल अशी गोष्ट आहे ना ही?
प्रश्नकर्ता : हो. आणि जास्त आसक्ती असेल तिथे मत्सर पण जास्त असतो ना?
दादाश्री : आसक्ती मुळेच तर ही सर्व झंझट होत असते. ज्या घरात नवरा-बायको आपापसात खूप भांडत असतील तर आपण समजावे की इथे आसक्ती जास्त आहे, इतके समजूनच घ्यावे. म्हणून त्यास आम्ही काय म्हणतो? 'भांडतात' असे म्हणत नाही, एकमेकाला चापट मारत असतील तरीही आम्ही 'भांडत आहेत' असे म्हणत नाही? आम्ही त्यास पोपटमस्ती म्हणतो. एक पोपट दुसऱ्या पोपटाला अशी चोच मारतो तेव्हा दुसरा पोपटही त्याला चोच मारतो, एकमेकाला चोच मारतात पण रक्त काढत नाही. हो, ही पोपट मस्ती ! तुम्ही पाहिली नाही का अशी पोपट मस्ती?
आता जेव्हा अशी खरी गोष्ट ऐकतो तेव्हा आपल्याला आपल्याच चुकांवर, आपल्या मूर्खपणावर हसू येते. खरी गोष्ट ऐकल्यानंतर मनुष्याला वैराग्य येते की अरे, आपण अशा चुका केल्या? फक्त चुकाच नाही पण दुःखही फार सोसले.
दोष, आक्षेप तिथे प्रेम असेल? लोक आसक्तीला प्रेम मानून गोंधळतात. पत्नीला पतीकडे काम आणि पतीला पत्नीकडे काम, हे सर्व कामामुळेच उभे झाले आहे. काम झाले नाही तर आत सर्व बोंबा मारतात, हल्ला करतात.या संसारात एक मिनिट देखील आपले कोणी झालेच नाही. आपले कोणी होतच नाही. हे तर जेव्हा वेळ येईल तेव्हा कळेल. तुम्ही तासभर मुलाला रागवाल तेव्हा कळेल की मुलगा आपला आहे की परका? अरे, कोर्टात केस करायला सुद्धा तयार होईल, मग वडील सुद्धा काय म्हणतील? 'ही माझी स्वतःची कमाई आहे तुला एक पै देखील देणार नाही' त्यावर मुलगाही म्हणेल 'मी तुम्हाला मारून-झोडून पैसे घेईन. यात आपलेपणा असतो का?' फक्त ज्ञानी पुरुषच आपले होतात.