________________
३६
काय कारण? त्याला लागले म्हणून? नाही, त्याला लागल्याचे दु:ख नाही, त्याचा अपमान केला याचे दुःख आहे.
प्रेमामुळेच वश होतात या दुनियेला सुधारण्याचा मार्गच प्रेम आहे. जग ज्याला प्रेम मानते ते प्रेम नाही. ती तर आसक्ती आहे. तुम्ही ह्या बेबीवर प्रेम करता, परंतु तिने जर काचेचा पेला फोडला तर तुमचे प्रेम राहते? तेव्हा तर तुम्ही चिडता. म्हणजे ती आसक्ती आहे.
प्रेमानेच सुधारते जग आणि प्रेमानेच सुधारते. हे सर्व सुधारायचे असेल, तर ते प्रेमानेच सुधारेल, या सर्वांना मी सुधारतो, ते प्रेमाने सुधारतो. हे देखील आम्ही प्रेमानेच सांगत आहोत ना! प्रेमाने सांगितले म्हणजे गोष्ट बिनसणार नाही आणि जर द्वेषाने सांगू तर सर्व बिनसेल. दुधात दही पडले नसेल पण अशीच जरा हवा लागली, तरी त्या दुधाचे दही बनून जाते. ___म्हणजे प्रेमाने सर्वकाही बोलू शकतो. जो प्रेमवाला मनुष्य आहे ना, तो सर्वकाही बोलू शकतो. आम्ही काय सांगू इच्छितो? की प्रेमस्वरुप व्हा, तर हे जग तुमचेच आहे. जिथे वैर असेल तिथे वैरातून हळूहळू प्रेम स्वरूप व्हा. वैरामुळे हे जग इतके 'रफ' (रुक्ष) दिसते. पाहा ना, येथे प्रेम स्वरूप, येथे कोणासही थोडे सुद्धा वाईट वाटत नाही आणि सर्व किती आनंदाने राहतात.
कदर मागतात तिथे प्रेम कसले? बाकी, या काळात प्रेम पाहायला मिळणार नाही. ज्यास खरे प्रेम म्हणतात ना ते पाहायला मिळणारच नाही. अरे, एक माणूस मला सांगत होता की, 'माझे तिच्यावर इतके सारे प्रेम आहे' 'तरीही ती मला झिडकारते.' मी म्हणालो ' ते प्रेम नाही. प्रेमाचा तिरस्कार कोणी करतच नाही.'
प्रश्नकर्ता : आपण ज्या प्रेमाची गोष्ट करीत आहात त्या प्रेमात अपेक्षा असतात का?