________________
अभेद प्रेम तिथे बुद्धीचा अंत भगवंत कसे आहेत? अनासक्त! कुठेही आसक्त नाहीत. प्रश्नकर्ता : आणि ज्ञानी सुद्धा अनासक्तच आहेत ना?
दादाश्री : हो, म्हणूनच आमचे निरंतर प्रेम असते आणि ते सर्व ठिकाणी सारखेच, एकसमान प्रेम असते. शिव्या देईल त्याच्यावरही एकसमान आणि फुले वाहील त्याच्यावरही एकसमान. आणि फुले नाही वाहत त्याच्यावरही एकसमान प्रेम. आमच्या प्रेमात भेद पडत नाही, असे अभेद प्रेम आहे. म्हणजे तिथे बुद्धी नसते, बुद्धी निघून जाते. नेहमी, प्रेम आधी बुद्धीस तोडून टाकते किंवा मग बुद्धी प्रेमास आसक्त बनविते. म्हणजे बुद्धी असेल तिथे प्रेम नसतो आणि प्रेम असेल तिथे बुद्धी नसते. बुद्धी समाप्त झाली, म्हणजे अहंकारही समाप्त झाला. मग काही उरलेच नाही, आणि ममता नसेल तेव्हाच प्रेमस्वरूप होऊ शकेल. आम्ही तर अखंड प्रेमवाले! आम्हाला या देहावर ममता नाही. या वाणीवर ममता नाही आणि मनावरही ममता नाही.
वीतारागतेतून प्रेमाचा उद्भव खरे प्रेम कोठून आणायचे? तर अहंकार आणि ममता गेल्यानंतरच खरे प्रेम असते. अहंकार आणि ममता गेल्याशिवाय खरे प्रेम नसतेच कधी. खरे प्रेम हे वीतरागतेमधून उत्पन्न झालेली वस्तू आहे.
___ द्वंद्वातीत झाल्यानंतर वीतराग होतो. द्वैत आणि अद्वैत हे द्वंद्व आहे. द्वैत आणि अद्वैतवाल्यांना द्वैताचे विकल्प येतात. 'ते द्वैत, ते द्वैत, ते द्वैत'! त्यांना मग द्वैत चिकटते. पण तरी ते अद्वैत पद चांगले आहे. अद्वैतापासून तर अजून एक लाख मैल पुढे जाईल त्यानंतर वीतरागतेचे पद येईल आणि वीतरागतेचे पद आल्यानंतर आत प्रेम उत्पन्न होईल आणि तेव्हा जे प्रेम उत्पन्न होते ते म्हणजे परमात्म प्रेम. दोन चापट मारल्या तरी ते प्रेम घटत नाही आणि जर घटले तर आपण समजावे की ते प्रेम नव्हते.
समोरच्याचा धक्का आपल्याला लागला त्यास हरकत नाही, परंतु