________________
प्रेम
दादाश्री : प्रेम तर सर्वांनाच कळते. दीड वर्षाच्या मुलासही कळते. त्यासच प्रेम म्हटले जाते. दुसरी सर्व तर आसक्तीच आहे. कुठल्याही परिस्थितीत प्रेम वाढत नाही किंवा कमी होत नाही त्यास प्रेम म्हणतात. तेव्हा यास प्रेम म्हणायचेच कसे ? ही तर भ्रांतीच आहे. भ्रांत भाषेचा शब्द आहे.
४६
आसक्तीमधून उद्भवते वैर
जगाने सर्व काही पाहिले परंतु प्रेम पाहिले नव्हते, आणि जग ज्यास प्रेम म्हणते ती तर आसक्ती आहे. आसक्तीतूनच ही सर्व ढवळाढवळ होत असते.
लोक समजतात की हे जग प्रेमामुळेच टिकून राहिले आहे. परंतु प्रेमामुळे हे जग टिकून राहिले नाही. वैरामुळे टिकून राहिले आहे, प्रेमाचे फाऊंडेशनच नाही. वैराच्या फाऊंडेशनवरच उभे राहिले आहे. वैराचेच फाऊंडेशन आहे. तेव्हा हे वैर सोडा. म्हणून तर आम्ही वैराचा निकाल लावा असे म्हणत असतो ना? समभावे निकाल लावण्याचे हेच तर कारण आहे.
भगवंत म्हणतात की द्वेष परिषह उपकारी आहे. प्रेम परिषह कधीच सुटणार नाही. संपूर्ण जग प्रेम परिषहातच फसलेले आहे म्हणून प्रत्येकास दुरून नमस्कार करून सुटून जावे. कोणावरही प्रेम ठेऊ नका. आणि कोणाच्या प्रेमात फसूही नका. प्रेमाचा तिरस्कार करून सुद्धा मोक्षाला जाता येत नाही. तेव्हा सावध राहा! मोक्षाला जायचे असेल तर विरोधकांचे उपकार मानावे. जे प्रेम करतात तेच आपल्याला बंधनात टाकतात, जेव्हा की विरोध करणारे तर उपकारी - मदतगार ठरतात. ज्यांनी आपल्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे त्यांचा तिरस्कार होणार नाही, अशाप्रकारे सुटून जावे. कारण प्रेमाच्या तिरस्काराने संसार उभा राहिला आहे.
'स्वतः' आहे स्वभावानेच अनासक्त
तुम्ही स्वतःच अनासक्त आहात. मी काही तुम्हाला अनासक्ती दिलेली नाही. अनासक्त हा तर तुमचा स्वभावच आहे. आणि तुम्ही दादांचे