Book Title: Pure Love Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 53
________________ शरीरात लोहचुंबक नावाचा गुण उत्पन्न होतो, तेव्हा जिथे स्वत:चे परमाणू जुळतात तिथेच आकर्षण निर्माण होते. इतरांबरोबर काहीच होत नाही. त्या आकर्षणालाच आपले लोक राग-द्वेष म्हणतात. म्हणतील 'माझा देह ओढला जात आहे.' अरे, तुझी इच्छा नाही तरीही देह का ओढला जातो? मग तिथे 'तू कोण आहेस?' आपण देहाला म्हटले की, 'तू जाऊ नकोस' तरी उठून चालायला लागतो. कारण हा देह परमाणुंपासून बनलेला आहे ना, परमाणुंचीच ओढ आहे ही. जुळणारे परमाणू असतील तिथे हा देह ओढला जातो. नाही तर आपली इच्छा नसेल तरीही हा देह कसा ओढला जाईल? देह ओढला जातो त्यास जगातील लोक म्हणतात 'मला याच्यावर फार राग (मोह) आहे. आपण जर त्याला विचारले की, भाऊ, ओढवून घ्यायची तुझी इच्छा आहे ?' तर तो म्हणतो 'नाही, माझी इच्छा तर नाही, तरी सुद्धा, मी ओढला जातो.' तर मग हा राग नाही. हा तर आकर्षणचाच गुण आहे. पण तरी ज्ञान नसेल तर त्यास आकर्षण म्हटले जात नाही. कारण त्याला तर असेच वाटते की, 'हे मीच केले' आणि हे 'ज्ञान' असेल तर 'स्वतः' फक्त जाणतो की आकर्षणामुळे हा देह ओढला गेला यात मी काहीच केले नाही. म्हणजे हा देह क्रियाशील बनतो आणि ओढला जातो. हे सर्व परमाणुंचेच आकर्षण आहे. हे मन-वचन-काया आसक्त स्वभावाचे आहेत. आत्मा आसक्त स्वभावाचा नाही.आणि हा जो देह आसक्त होतो ते लोहचुंबक आणि टाचणीसारखे आहे. कारण कोणतेही लोहचुंबक असो पण ते तांब्याला ओढत नाही. ते कशास ओढेल? हो, फक्त लोखंडालाच ओढेल. पितळ असेल तर ओढत नाही. अर्थात स्वजातीयलाच ओढतो. तसेच आपल्या शरीरात जे परमाणू आहेत ते लोहचुंबकवाले आहेत, ते स्वजातीयलाच ओढतात. समान स्वभावाचे परमाणूच ओढले जातात. वेडया बायकोशी पटते आणि शहाणी बहिण जरी त्याच्याशी चांगले बोलत असेल तरी तिच्याशी पटत नाही. कारण तिथे परमाणू जुळत नाहीत. म्हणजे या मुलांवर सुद्धा आसक्तीच आहे. परमाणू-परमाणू जुळून

Loading...

Page Navigation
1 ... 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76