________________
४३
करायला गेलो काय आणि झाले काय? प्रश्नकर्ता : दादा, तुम्ही कशाप्रकारे अनासक्त झालात?
दादाश्री : सर्व आपोआप ‘बट नॅचरल' प्रकट झाले. मला काही माहीत नाही की हे कसे काय घडले!
प्रश्नकर्ता : परंतु आत्ता तरी आपणास माहीत पडते ना? त्या पायऱ्या आम्हाला सांगा ना.
दादाश्री : मी काही करायला गेलो नव्हतो, काही झालेही नव्हते. मी करायला गेलो काय आणि झाले काय! मी तर दुधात तांदूळ टाकून एवढीसी खीर बनवायला गेलो होतो, परंतु हे तर अमृत तयार झाले!! ते सर्व पूर्वीचे सामान जमा झालेले. मला असे वाटायचे की आत आपल्याजवळ काहीतरी आहे, इतके नक्कीच वाटायचे. त्याचा थोडा घमेंडही वाटायचा.
प्रश्नकर्ता : म्हणजे मला वाटले की आपण ज्याप्रकारे अनासक्त झालात त्याचे वर्णन कराल तर ती रीत मलाही समजेल.
दादाश्री : असे आहे की, हे 'ज्ञान' घेतले आणि मग जो आमच्या आज्ञेत राहतो त्याला अनासक्त म्हटले जाते. मग जरी तो खात-पित असेल किंवा काळा कोट घालत असेल किंवा पांढरा कोट-पँट घालत असेल, वाटेल ते घालत असेल परंतु जो आमच्या आज्ञेत राहिला तो अनासक्त म्हटला जातो. आमच्या आज्ञा अनासक्तीचेच 'प्रोटेक्शन' आहे.
आसक्ती, परमाणूंचे विज्ञान हे कशासारखे आहे ? येथे हा लोहचुंबक असेल आणि येथे टाचणी असेल तर आपण लोहचुंबकाला जरा असे असे फिरवले तर टाचणी वर-खाली होते की नाही? तर होते. लोहचुंबक जवळ नेले तर टाचणी त्याला चिकटते. त्या टाचणीमध्ये आसक्ती कोठून आली? तसेच या शरीरात लोहचुंबक नावाचा गुण आहे. कारण आत इलेक्ट्रिक बॉडी आहे. म्हणजे त्या बॉडीच्या आधाराने ही इलेक्ट्रिसिटी उत्पन्न झाली आहे. त्यामुळे