________________
५२
दादाश्री : हो, प्रेमाचाच परिणाम आहे. म्हणजे प्रेमाच्या शस्त्रानेच शहाणे होतात. मला ओरडावे लागत नाही.
मी कोणासोबतही भांडू इच्छित नाही, माझ्याजवळ तर फक्त एक प्रेमाचेच शस्त्र आहे, 'मी प्रेमाने जगाला जिंकू इच्छितो.'
कारण मी सर्व शस्त्रे खाली ठेवून दिली आहेत. जग शस्त्रांमुळेच विरोधी होत असते, क्रोध-मान-माया-लोभ, ही शस्त्रे मी खालीच ठेवून दिली. म्हणजे ती मी वापरत नाही, मी प्रेमाने जगास जिंकू इच्छितो. जग जे समजते ते तर लौकिक प्रेम आहे. प्रेम तर त्याचे नाव की तुम्ही मला शिव्या दिल्या तर मी डिप्रेस होणार नाही आणि हार घालाल तर एलिवेट होणार नाही, त्यास प्रेम म्हटले जाते. खऱ्या प्रेमात तर कधीच फरक पडत नाही. या देहाच्या भावामध्ये फरक पडेल, परंतु शुद्ध प्रेमात फरक पडत नाही.
मनुष्य सुंदर असले तरी अहंकारामुळे कुरूप दिसतात. सुंदर केव्हा दिसतात? तर म्हणे, प्रेमात्मा होतात तेव्हा, तेव्हा तर कुरूप देखील सुंदर दिसतो. शुद्ध प्रेम प्रकट होते तेव्हाच सुंदर दिसायला लागतो. जगातील लोकांना काय हवे आहे ? मुक्त प्रेम. ज्या प्रेमात स्वार्थाचा गंध किंवा कोणत्याही प्रकारचा मतलब नसतो.
हा तर निसर्गाचा कायदा आहे, नॅचरल लॉ! कारण प्रेम हे स्वतःच परमात्मा आहे.
जिथे प्रेम तिथेच मोक्षमार्ग अर्थात जिथे प्रेम दिसत नाही तिथे मोक्षाचा मार्गच नाही.तुम्हाला काहीच येत नसेल, बोलता देखील येत नसेल, तरी सुद्धा त्यांनी प्रेम लावले तरच खरे.
म्हणजे एक तर प्रामाणिकता आणि दुसरे प्रेम, की जे कधी कमी-जास्त होत नाही. या दोन्ही जागी भगवंत राहतात. कारण जिथे प्रेम आहे, निष्ठा आहे, पवित्रता आहे, तिथेच भगवंत आहेत.