________________
तर दिसलेच ना? व्यवहारात 'मी', 'तू ' असे बोलावे पण दिसला पाहिजे 'मी'च ना! प्रेम स्वरूप म्हणजे काय? तर सर्व अभेदभावाने पाहणे, अभेदभावाने वागणे, अभेदभावाने चालणे, अभेदभावच मानणे. हे वेगळे आहेत अशा प्रकारच्या सर्व मान्यता काढून टाकाव्या. याचेच नाव प्रेमस्वरूप. एकच परिवार आहे असेच वाटते.
ज्ञानीचे अभेद प्रेम वेगळे न होणे. याचे नाव प्रेम. भेद न करणे, याचेच नाव प्रेम! अभेदता झाली तेच प्रेम. प्रेम ही नॉर्मालिटी म्हटली जाते. भेद असेल तर कोणी चांगले काम करून आले की, खुश होतो. परत थोड्यावेळाने काही चुकीचे झाले, चहाचे कप पडले तर चिडतो, म्हणजे अबॉव नॉर्मल, बिलो नॉर्मल होतच असते. प्रेम, काम पाहत नाही, मूळ स्वभावाचे दर्शन करते. काम तर, आपल्याला नॉर्मालिटीत प्रॉब्लेम होणार नाही, असेच काम होतात.
प्रश्नकर्ता : आम्हाला आपल्याप्रति जो भाव जागृत होतो ते काय आहे?
दादाश्री : ही तर आमच्या प्रेमाची पकड आहे. आमच्या प्रेमाने तुम्हाला पकडले आहे. खरे प्रेम साऱ्या जगास पकडू शकते. प्रेम कुठे कुठे असते? तर जिथे अभेदता असते तिथे प्रेम असते. म्हणजे जगासोबत अभेदता केव्हा म्हटली जाते? प्रेमस्वरूप व्हाल तेव्हा. संपूर्ण जगासोबत अभेदता म्हटली जाते तिथे मग प्रेमाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही.
आसक्ती केव्हा म्हटली जाते? तर जेव्हा कोणती संसारी वस्तू घ्यायची असेल तेव्हा. संसारी वस्तूचा हेतू असतो तेव्हा आणि ह्या खऱ्या सुखासाठी तर फायदा होईल, याची हरकत नाही. आमच्यावर जे प्रेम राहते याची हरकत नाही. ते तुम्हाला हेल्प करेल. दुसऱ्या आड जागेवर होणारे प्रेम उठून जाईल.
प्रश्नकर्ता : म्हणजे आमच्यात जागृत होणारा भाव, तो आपल्या हृदयाच्या प्रेमाचाच परिणाम आहे असेच ना?