________________
प्रेम केव्हा उत्पन्न होते? तर आतापर्यंत ज्या चुका झाल्या असतील, त्यांची माफी मागून घेतली, तेव्हा प्रेम उत्पन्न होते.
त्यांचा एकही दोष झाला नाही, पण मला त्यांचा दोष दिसला म्हणून तो माझाच दोष होता.
ज्यांच्याशी प्रेम स्वरूप व्हायचे असेल, तिथे अशाप्रकारे वागावे. तेव्हा तुम्हाला प्रेम उत्पन्न होईल. प्रेम करायचे आहे की नाही?
प्रश्नकर्ता : हो दादा.
दादाश्री : आमची हीच पद्धत आहे. आम्ही ज्याप्रकारे तरलो त्याचप्रकारे सर्वांना तारतो.
तुम्हीही प्रेम उत्पन्न कराल ना? आपण प्रेम स्वरूप होतो तेव्हा समोरच्याला अभेदता वाटते. अशाच प्रकारे आमच्याशी सर्व अभेद झाले आहेत. ही रीत आम्ही उघड करून टाकली.
सर्वांमध्ये 'मी' पाहतो, तो प्रेममूर्ती आता जितका भेद मिटतो, तितके शुद्ध प्रेम उत्पन्न होते. शुद्ध प्रेम उत्पन्न होण्यासाठी आपल्यातून काय निघून जायला हवे? एखादी वस्तू निघेल तेव्हा ती दुसरी वस्तू येईल. व्हॅ क्युम (शुन्यावकाश) राहू शकत नाही. म्हणजे यातून जेव्हा भेद जातो तेव्हा शुद्ध प्रेम उत्पन्न होते. अर्थात जितका भेद जातो तितके शुद्ध प्रेम उत्पन्न होते. संपूर्ण भेद मिटेल तेव्हा संपूर्ण शुद्ध प्रेम उत्पन्न होते. हीच रीत आहे.
तुम्हाला हा पॉइंट ऑफ व्ह्यू (दृष्टीकोन) समजला? हा वेगळ्या प्रकारचा आहे आणि प्रेममूर्ती व्हायचे आहे. सगळे एकच वाटतील, वेगळेपण वाटतच नाही. म्हणतील 'हे आमचे आणि हे तुमचे.' पण या जगातून जाते वेळी 'आमचे तुमचे' असते का? तर या रोगामुळेच वेगळेपण वाटते. हा रोग निघून गेला, तर प्रेममूर्ती होतो.
प्रेम म्हणजे हे सर्व 'मीच आहे' 'मीच' दिसत आहे. नाही तर 'तू' म्हणावे लागेल. 'मी' नाही दिसला, तर 'तू' दिसणार. दोघांपैकी एक