Book Title: Pure Love Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 63
________________ ५४ ट्रेनमध्ये सगळी माणसे बसली असतील आणि ट्रेन इमोशनल झाली तर काय होईल? प्रश्नकर्ता : गडबड होईल, एक्सिडेंट हाईल. दादाश्री : लोक मरतील. त्याचप्रमाणे ही माणसे जेव्हा इमोशनल होतात तेव्हा (शरीराच्या) आत इतके सारे जीव मरतात आणि त्याची जबाबदारी स्वत:वर येते. इमोशनल झाल्यामुळे अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या येतात. प्रश्नकर्ता : इमोशन नसलेला मनुष्य दगडासारखा नाही का होणार? दादाश्री : मी इमोशनल नाही, मग मी काय दगडासारखा वाटतो? माझ्यात अजिबात इमोशन नाही. इमोशन असलेला मिकेनिकल होऊन जातो. पण मोशनवाला मिकेनिकल होत नाही ना! प्रश्नकर्ता : पण जर स्वत:चे 'सेल्फ रियलाईज' झाले नसेल, तर मग इमोशन नसलेला माणूस दगडासारखाच वाटेल ना? दादाश्री : असे नसतेच. असे होतच नाही ना. असे कधीच होत नाही, नाही तर मग त्याला मेंटल हॉस्पिटलला घेऊन जातात. पण ते मेंटल सुद्धा इमोशनलच असतात. संपूर्ण जगच इमोशनल आहे. अश्रुने जो व्यक्त होतो, तो नाही खरा जिव्हाळा प्रश्नकर्ता : संसारात राहण्याकरिता जिव्हाळ्याची गरज आहे. जिव्हाळा व्यक्त करावाच लागतो. जिव्हाळा व्यक्त केला नाही तर कठोर म्हणतात. परंतु आता ज्ञान मिळाले, ज्ञानाची समज आत उतरली त्यानंतर जिव्हाळा तितका व्यक्त केला जात नाही. तर आता व्यवहारात जिव्हाळा व्यक्त करावा का? दादाश्री : काय घडते ते पाहायचे. प्रश्नकर्ता : उदाहरणार्थ मुलगा परदेशी शिकायला जात असेल तेव्हा एयरपोर्टवर आई आणि वडील दोघेही गेले आईच्या डोळ्यातून अश्रू

Loading...

Page Navigation
1 ... 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76