________________
५५
वाहिले पण वडील रडले नाहीत. म्हणून तू कठोर दगडासारखा आहेस असे म्हणतात.
दादाश्री : नाही, जिव्हाळा असा नसतो. परदेशी जात असेल तरी काय? जर तिच्या डोळ्यात अश्रू येत असतील तर तिला दटावले पाहिजे की, मोक्षाला जायचे असेल तर इतकी हळवी कुठवर राहशील?
प्रश्नकर्ता : नाही, म्हणजे असे की जिव्हाळा नसेल तर मनुष्य फार कठोर होऊन जातो. जिव्हाळा नसलेला मनुष्य फार कठोर असतो.
दादाश्री : ज्याच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत त्याचाच खरा जिव्हाळा आहे आणि तुमचा जिव्हाळा खोटा आहे. तुमचा जिव्हाळा दिखाव्याचा आहे आणि त्याचा जिव्हाळा खरा आहे. खरा जिव्हाळा हार्टिली असतो. हे सर्व चुकीचे धरून बसले आहेत. जिव्हाळा काही बळजबरीने होत नसतो. ती तर नेचरल गिफ्ट आहे. जर असे म्हणत असतील की कठोर दगडासारखा आहे तर जिव्हाळा उत्पन्न होत असेल तोही बंद होतो. हे रडणे आणि मग लगेच विसरून जाणे त्यास जिव्हाळा म्हटले जात नाही. जिव्हाळा तर रडू सुद्धा न येणे आणि आठवण राहणे तोच खरा जिव्हाळा.
आमचा जिव्हाळा तर असा की आम्ही कधीच रडत नाही पण तरीही सर्वांवर आमचा कायमचाच जिव्हाळा. कारण जितके अधिक लोक भेटतात तितके सर्व तर रोज आमच्या ज्ञानात येतच असतात.
प्रश्नकर्ता : आई-वडील स्वत:च्या मुलांवर ज्या प्रकारे जिव्हाळा व्यक्त करतात, तेव्हा बऱ्याचदा असे वाटते की ते अति प्रमाणात व्यक्त करतात.
दादाश्री : ते सर्व इमोशनलच आहे. कमी दाखवणारे देखील इमोशनल म्हटले जातात. नॉर्मल असायला हवे. नॉर्मल म्हणजे फक्त नाटकीय! नाटकातील बायकोसोबत नाटक करणे, तो अगदी तंतोतंत, एकजॅक्ट. लोकांना त्यात कुठेही चूक दिसणार नाही. पण मग त्या नाटकातील बायकोला बाहेर निघताना सांगितले की आता तू चल