________________
उपकार मानता की दादांनी अनासक्ती दिली. नाही, माझे उपकार मानण्याची गरजच नाही, आणि 'मी उपकार करतो' असे जर मी मानले तर माझे प्रेम सरत जाईल. माझ्याकडून 'मी उपकार करतो' असे मानले जाऊ शकत नाही. म्हणजे यात स्वत:ला पूर्ण समजदारीपूर्वक राहावे लागते. संपूर्ण जागृतीत राहावे लागते.
__ अनासक्त हा तुमचा स्वत:चाच स्वभाव आहे. तुम्हाला काय वाटते? मी दिले आहे की तो तुमचा स्वत:चा स्वभावच आहे ?
प्रश्नकर्ता : स्वतःचा स्वभावच आहे ना!
दादाश्री : हो, मग असे बोलना. हे तर सर्व 'दादांनी दिले, दादांनी दिले' असे म्हणाल तर केव्हा पार येईल?
प्रश्नकर्ता : परंतु याचे भान तर तुम्हीच करवून दिले ना?
दादाश्री : हो, पण भान करविले एवढेच! 'सर्व मी दिले आहे,' असे तुम्ही म्हणता, पण ते तुमचेच आहे आणि तेच तुम्हाला दिले आहे.
प्रश्नकर्ता : हो, आमचे आहे ते तुम्ही दिले, परंतु आमचे होते असे आम्ही जाणतच नव्हतो ना!
दादाश्री : जाणत नव्हते परंतु जाणलेच ना शेवटी! जाणले त्याचा तर रुबाबच वेगळा ना! त्याचा कसा तर रुबाब असतो! नाही का? कोणी शिव्या दिल्या तरी रुबाब जात नाही. हो, केवढा रुबाब! आणि (ज्ञान नसेल) त्या रुबाबवाल्याचा? त्याचा आदर-सत्कार केला नाही तर तो अगदी हिरमुसतो. रिसेप्शनमध्ये त्याचा सत्कार करायचा राहून गेला तर हिरमुसतो!! सर्वांचा सत्कार केला आणि मी राहून गेलो. पाहा, तरी ह्या रुबाबात आणि त्या रुबाबात किती फरक आहे ते.
प्रश्नकर्ता : म्हणजे आधी जिथे आसक्त असू तिथेच नंतर अनासक्त होऊ.
दादाश्री : हो, हाच तर मार्ग आहे ना! हे सर्व त्याचे स्टेपिंगच आहेत. आणि शेवटी तर अनासक्त योगातच यायचे आहे.