________________
आले. तीन परमाणू आपले आणि तीन परमाणू त्यांचे, असे परमाणू जुळून आलेत म्हणून आसक्ती होते. माझे तीन परमाणू आणि तुमचे चार परमाणू असतील तर काहीच परिणाम होत नाही. म्हणजे हे सर्व विज्ञानच आहे.
आसक्ती हा देहाचा गुण आहे, परमाणूंचा गुण आहे. तो गुण कसा आहे? लोहचुंबक आणि टाचणीचा जसा संबंध आहे तसाच हा संबंध आहे. देहास जुळतील, अशा परमाणुंमध्येच देह ओढला जातो, तेव्हा ती आसक्ती आहे.
आसक्ती तर अबॉव नॉर्मल आणि बिलो नॉर्मल सुद्धा असू शकते. जेव्हा की प्रेम नॉर्मालिटीत असते. एकसमानच असते. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल होतच नाही. ही आसक्ती तर जडची आहे, चैतन्यात नाममात्र आसक्ती नसते.
व्यवहारात अभेदता राहते त्यामागे पण कारण आहे. ते परमाणू आणि आसक्तीचे गुण आहेत. परंतु त्यात कुठल्याक्षणी काय घडेल ते सांगता येत नाही. जोपर्यंत परमाणू जुळतात तोपर्यंत आकर्षण होते आणि त्यामुळे अभेदता वाटते. आणि जर परमाणू जुळले नाहीत तर विकर्षण होते व वैर निर्माण होते. अर्थात आसक्ती असेल तिथे वैर असतेच. आसक्तीमध्ये हित-अहिताचे भान राहत नाही. प्रेमात संपूर्ण हित-अहिताचे भान राहते.
म्हणजे हे परमाणूंचे सायन्स आहे. यात आत्म्याला काही सुद्धा देणेघेणे नाही. परंतु लोक भ्रांतीमुळे परमाणुंच्या आकर्षणालाच असे मानतात की 'मी ओढला गेलो' आत्मा कधीच ओढला जात नाही.
भ्रांतीची मान्यता कुठे आणि वास्तविकता कुठे!
हे तर सुई आणि लोहचुंबकच्या आकर्षणामुळे तुम्हाला असे वाटते की मला प्रेम आहे म्हणून मी ओढला जातो. परंतु त्यात प्रेमासारखे काही नाहीच.
प्रश्नकर्ता : तर लोकांना हे कळत नाही की आपले प्रेम आहे की नाही?