________________
३४
दादाश्री : हो खरी गोष्ट आहे. तो आपल्यासाठी दरवाजे बंद करेल त्या अगोदर आपण थांबायला हवे. त्याला दरवाजे बंद करण्याची वेळ येईपर्यंत थांबलो नाही तर आपला मूर्खपणा ठरेल. काय? असे होता कामा नये. आणि माझा सत्तावाही आवाज कधीही निघाला नाही. सत्तावाही आवाज असता कामा नये. लहान असेपर्यंत सत्तावाही आवाज दाखवावा लागतो, 'चूप बस' असे. पण तेव्हा सुद्धा मी प्रेमच दाखवितो. मी प्रेमाने वश करू इच्छितो.
प्रश्नकर्ता : प्रेमात जितकी पॉवर (शक्ती) आहे, तितकी पॉवर सत्तेत नाही ना?
दादाश्री : नाही, पण जोपर्यंत आधीचा कचरा (दोष) निघत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रेम उत्पन्न होत नाही ना! तू आता सर्व कचरा काढतेस की नाही काढत? ते किती चांगले, हार्टवाले आहेत! जे हार्टीली असतात ना, त्यांच्याशी भांडायचे नाही. त्यांच्याशी तू चांगली वाग. वाद घालायचा असेल तर बुद्धीवाल्याशी वाद घाल.
रोपटे लावले असेल तर त्याला सतत रागवू नये की तू वाकडे होऊ नकोस, फुले मोठी आण. आपण त्याला खत पाणी देत राहावे. गुलाबाचे रोप जर इतके सारे काम करते, तर ही मुले तर मनुष्य आहेत! आणि आई-वडील तर त्यांना रागावतात सुद्धा, धोपटतात सुद्धा.
नेहमी प्रेमानेच जग सुधारते, त्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. जर धाकाने सुधारत असेल ना तर ही सरकार लोकतंत्राला उडवून टाकेल आणि जो कोणी गुन्हा करेल त्याला जेलमध्ये टाकेल व फाशी देईल. जग प्रेमानेच सुधारते.
प्रश्नकर्ता : कित्येक वेळा, आम्ही प्रेम करत असतो तरीही समोरची व्यक्ती समजू शकत नाही.
दादाश्री : मग तेव्हा आपण काय करावे? शिंगे उगारावी? प्रश्नकर्ता : काय करावे तेच कळत नाही.