________________
हे तुम्ही तुमच्या प्रेमाला संकुचित केले आहे की, 'ही बायको आणि ही मुले,' जेव्हा की माझे प्रेम विस्तारपूर्वक आहे.
प्रश्नकर्ता : प्रेम इतके संकुचित असू शकते की एकच व्यक्ती पुरते मर्यादित राहते?
दादाश्री : प्रेम संकुचित असूच शकत नाही. त्यासच प्रेम म्हणतात. जर संकुचित असेल ना की तितक्या चौकटी पुरतेच, तर ती आसक्ती म्हटली जाते. संकुचित म्हणजे कसे? तर चार भाऊ असतील, आणि त्या चौघांना तीन-तीन मुले असतील, ते सर्व एकत्र रहात असतील तोपर्यंत घरात 'आमचे आमचे' असे बोलतात. आमचा ग्लास फुटला असे बोलतात. पण मग चौघेही जेव्हा वेगळे होतात तेव्हा लगेच दुसऱ्याच दिवसापासून, म्हणजे बुधवारी वेगळे झाले तर गुरुवारी ते काही वेगळेच बोलतात. 'हे आमचे आणि हे तुमचे' अशी संकुचितता येत जाते. म्हणजे पूर्ण घरात जे प्रेम पसरलेले होते ते आता वेगळे झाल्यामुळे संकुचित झाले. मग जेव्हा पूर्ण गल्लीनुसार, युवक मंडळानुसार काही कार्य करायचे असेल तेव्हा परत त्यांचे प्रेम एक होते. प्रेम असेल तिथे संकुचितता नसते, विशालता असते.
राग आणि प्रेम प्रश्नकर्ता : तर प्रेम आणि राग (आसक्ती, मोह) हे दोन्ही शब्द
समजवा.
दादाश्री : राग ही पौद्गलिक (पुरण-गलन होणारी) वस्तू आहे आणि प्रेम ही खरी वस्तू आहे. आता प्रेम कसे असायला हवे? की जे वाढत नाही आणि घटतही नाही, त्यास प्रेम म्हटले जाते. आणि वाढतेघटते त्यास राग म्हटले जाते. राग आणि प्रेमात फरक असा आहे की जो एकदम वाढतो त्यास राग म्हणतात, मग फसलाच समजा. जर प्रेम वाढले तर रागात परिणमित होते. प्रेम कमी झाले तर द्वेषात परिणमित होते, म्हणून त्यास प्रेम म्हटलेच जात नाही ना! हे तर आकर्षण आणि विकर्षण आहे. आपले लोक ज्याला प्रेम म्हणतात त्यास भगवंत आकर्षण म्हणतात.