________________
दादाश्री : म्हणजे चुकभूल झाली असेल तर प्रेमापोटी सोडून द्यावी. या मुलावर आपले प्रेम असेल ना, तर मुलांची चूक तुम्हाला दिसणार नाही. असू दे, काही हरकत नाही. असेच वाटते. प्रेमात सर्व निभावून घेतले जाते. निभावून घेतले जाते ना?
बाकी, ही तर सर्व आसक्ती आहे ! घटक्यात बायको गळ्यात हात घालून लगट करते, आणि घटक्यात वाद घालते. 'तुम्ही असे केले नी तुम्ही तसे केले.' प्रेमात कधीही चूक नसते. प्रेमात चूक दिसतच नाही. हे तर प्रेम आहेच कुठे? प्रेम नको का?
जेव्हा चूक दिसणारच नाही तेव्हा आपण समजावे की याच्यावर आपले प्रेम आहे ! खरोखर प्रेम असेल का या लोकांना?!
म्हणजे याला प्रेम म्हणायचेच कसे?
खरे तर, या काळात प्रेम पाहायला मिळतच नाही. ज्यास खरे म्हटले जाते ते प्रेम पाहायला मिळत नाही. अरे, एक माणूस मला म्हणतो की 'माझे तिच्यावर इतके प्रेम आहे, तरीही ती माझा तिरस्कार करते, मी म्हणालो ते प्रेम नव्हे. प्रेमाचा तिरस्कार कोणी करतच नाही.'
पती शोधतो अक्कल, पत्नी शोधते हुशारी
तेव्हा प्रेमात जो स्वतःची आहुती देतो, म्हणजे स्वत:ची सेफ साईड न ठेवता स्वतःची आहुती देतो, ते खरे प्रेम. हल्ली तर ही गोष्ट कठीणच आहे.
प्रश्नकर्ता : अशा प्रेमास काय म्हटले जाते? अनन्य प्रेम म्हटले जाते?
दादाश्री : संसारात याला प्रेम म्हटले जाते. हे आसक्तीमध्ये धरले जात नाही, आणि त्याचे फळ सुद्धा फार उच्च प्रकारचे मिळते. परंतु, स्वत:ची आहुती देणे, असे तर कधी घडत नाही ना! हे तर स्वत:ची 'सेफसाईड' ठेऊनच काम करतात. 'सेफसाईड' करणार नाहीत अशा स्त्रिया किती आणि असे पुरुष किती?