________________
कमावत नसेल तर पत्नी असे नाही का बोलत? मग तेव्हा तिचे प्रेम कुठे गेले? प्रेम असेल का या जगात? ही तर आसक्तीच आहे. जर खाण्यापिण्याचे सर्व व्यवस्थित असेल तर प्रेम (!) दिसते आणि पती बाहेर लफडयात पडला असेल तर ती म्हणेल, 'तुम्ही असे वागाल तर मी घर सोडून निघून जाईल' उलट पत्नीच पतीस असे झिडकारते. तो तर बापडा गुन्हेगार आहे म्हणून गप्प बसतो. मग यात प्रेम करण्यासारखे आहे तरी काय? हे तर कसे-बसे करून संसारगाडे पुढे ढकलायचे. खाण्या-पिण्याचे पत्नी बनवून देईल आणि तुम्ही पैसे कमावून आणायचे. अशाप्रकारे जेमतेम करून चालते मियाँ-बीबीची गाडी!
आसक्ती तिथे रिअॅक्शन सुद्धा प्रश्नकर्ता : परंतु बऱ्याच वेळा आपल्याला द्वेष करायचा नसतो तरी द्वेष होतोच, याचे काय कारण?
दादाश्री : कोणाबरोबर? प्रश्नकर्ता : समजा नवऱ्याबरोबर असे झाले तर?
दादाश्री : त्यास द्वेष म्हणत नाही. जे आसक्तीचे प्रेम आहे ना ते नेहमीच रिअॅक्शनरी असते. म्हणजे ते जर चिडले तर हे त्यांच्याकडे पाठ फिरवतात. पाठ फिरवली की थोडे दिवस एकमेकांपासून दूर राहतात, दूर राहिल्यामुळे परत प्रेम वाढते, प्रेम वाढले की ते प्रेम बोचते तेव्हा पुन्हा वाद होतो, नंतर पुन्हा प्रेम वाढते. म्हणजे जिथे अत्याधिक प्रेम असते तिथेच वाद होत असतात. तेव्हा जिथे वाद होत असतील ना, तिथे त्यांच्यात प्रेम आहे असे समजावे. प्रेम आहे म्हणूनच वाद होतात. हे पूर्व जन्मीचे प्रेम आहे म्हणून वाद होतात. अत्याधिक प्रेम आहे, त्याशिवाय वाद होणारच नाही ना! वादाचे स्वरूपच हे असे आहे.
लोक यास काय म्हणतात? संघर्षामुळेच तर आमचे प्रेम आहे, असे म्हणतात. तेव्हा ही गोष्ट सुद्धा खरीच आहे. ही आसक्ती संघर्षामुळेच तर झाली आहे. जिथे संघर्ष कमी, तिथे आसक्ती नसते. ज्या घरात पती