Book Title: Pure Love Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 32
________________ प्रेम २३ प्रश्नकर्ता : 'कम्पेनियन' मध्ये आसक्ती असते की नाही ? दादाश्री : हो, त्यातही आसक्ती असते, पण ती आसक्ती यांच्यासारखी नसते. यांचे तर शब्दच फार आसक्तीवाले ! शब्द गाढ आसक्तीवाले असतात. 'मालक आणि मालकीण' (पती आणि पत्नी) या शब्दातच इतकी गाढ आसक्ती आहे. आणि 'कम्पेनियन' म्हटले तर आसक्ती कमी होते. माझी नाही... एका माणसाची बायको वीस वर्षापूर्वी वारली होती, तर दुसऱ्या एका व्यक्तीने मला सांगितले की 'या काकांना मी रडवू ? ' मी म्हणालो, ‘कसे रडवणार?' या वयात तर ते रडणार नाहीत, त्यावर तो म्हणाला 'पाहा तरी, ते कसे सेन्सिटिव्ह ( भावूक) आहेत !' मग तो पुतण्या बोलला, 'काका, काकींची तर गोष्टच विचारू नका, किती चांगला त्यांचा स्वभाव !' तो असे बोलत होता तेवढ्यात तर काका खरोखरच रडायला लागले. अरे, काय हा वेडेपणा! साठाव्या वर्षी सुद्धा बायकोसाठी रडायला येते ? कसली ही माणसे ? हे लोक तर सिनेमात देखील रडतात ना ? सिनेमात कोणी मेला तर पाहणारा सुद्धा रडायला लागतो. प्रश्नकर्ता : पण मग ती आसक्ती सुटत का नाही ? दादाश्री : आसक्ती तर सुटत नाही, 'माझी, माझी' करून केले आहे, तर आता 'माझी नाही', 'माझी नाही' असा जप केल्याने बंद होईल. हे तर जे आटे फिरवले आहेत, ते आता उलगडावेच लागतील ना ! मतभेद वाढतात, तसतसे प्रेम वाढते पत्नीशी मतभेद होतात की नाही होत ? प्रश्नकर्ता : मतभेदाशिवाय तर पती - पत्नी म्हटलेच जात नाहीत ना ? दादाश्री : हो, का ? असे आहे ? असा नियमच असेल ? पुस्तकात असा नियम लिहिलेला असेल की मतभेद झाले तरच त्यांना पती-पत्नी म्हणायचे? मतभेद कमी-जास्त होतात की नाही ?

Loading...

Page Navigation
1 ... 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76