Book Title: Pure Love Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 30
________________ दादाश्री : वडिलांचे मतलबी प्रेम. 'माझे नाव उजळवेल असा आहे,' असे म्हणतील. फक्त आईचेच थोडेसे प्रेम, ते पण थोडेसेच. तिच्याही मनात असते की, मोठा होईल, माझी सेवा करेल, आणि श्राद्ध केले तरी खूप झाले. अशी एक लालूच आहे, म्हणजे जिथे कुठलीही लालूच असेल तिथे प्रेम नाही. प्रेम ही वस्तूच वेगळी आहे, आत्ता तुम्ही आमचे प्रेम पाहत आहात पण ते जर तुमच्या लक्षात आले तर. या जगातील कोणतीही वस्तू मला नकोच. तुम्ही लाखो डॉलर द्याल किंवा लाखो पौंड द्याल! जगभराचे सोने द्याल तरी ते माझ्या उपयोगाचे नाही. जगातील स्त्रीसंबंधी विचार सुद्धा येत नाही. मी ह्या शरीरापासून वेगळा राहतो. शेजाऱ्यासारखा राहतो. ह्या शरीरापासून वेगळा, शेजारी. 'फस्ट नेबर.' प्रेम सामावले नॉर्मालिटीत । आई हे देवीचे स्वरूप आहे. आपण देवीला मानतो ना, ते आईचे स्वरूप आहे. आईचे प्रेम खरे आहे, परंतु ते प्राकृत प्रेम आहे, आणि दुसरे म्हणजे भगवंताचे प्रेम असे असते. ज्यांनाही इथे भगवंत मानत असतील तिथे आपण पडताळून पाहिले पाहिजे. तिथे काही उलट केले किंवा उलट बोललो तरीही ते प्रेम करतात आणि खूप फुले वाहिली तरी देखील तसेच प्रेम करतात. घटत नाही, वाढत नाही, असे ते प्रेम असते. म्हणून त्यास प्रेम म्हटले जाते, आणि ते प्रेम स्वरूप, तेच परमात्म स्वरूप आहे. बाकी, जगाने खरे प्रेम पाहिलेच नाही. महावीर भगवंत गेल्यानंतर प्रेम शब्दच पाहिला नाही. सर्व आसक्तीच आहे. या संसारात प्रेम शब्दाचा उपयोग आसक्तीसाठीच केला जातो. प्रेम जर त्याच्या लेव्हलमध्ये असेल, नॉर्मालिटीत असेल तोपर्यंत ते प्रेम म्हटले जाते आणि नॉर्मालिटी सोडतो तेव्हा त्या प्रेमास आसक्ती म्हटली जाते. आईचे प्रेम त्यास प्रेम अवश्य म्हटले जाते पण जेव्हा नॉर्मालिटी सुटते तेव्हा आसक्ती म्हटली जाते. बाकी, प्रेम हेच परमात्म स्वरूप आहे. नॉर्मल प्रेम परमात्मा स्वरूप आहे. गुरु-शिष्याचे प्रेम शुद्ध प्रेमाने सर्व दरवाजे उघडतात. गुरूच्या प्रेमाने काय प्राप्त होत

Loading...

Page Navigation
1 ... 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76