________________
प्रश्नकर्ता : अग्नी देतात.
दादाश्री : असे होय? मग घरी येऊन काही खात नसेल नाही का? खातो ना! तर हे असे आहे, औपचारिकता आहे, सर्वांना माहीत आहे की हे रिलेटिव्ह नाते आहे. गेला तो गेला. मग घरी येऊन आरामात
खातात.
प्रश्नकर्ता : मग एखादी व्यक्ती मेली तर आपण त्याच्यासाठी मोहामुळे रडतो की शुद्ध प्रेम असते म्हणून रडतो? ।
दादाश्री : दुनियेत शुद्ध प्रेम कुठेही नसते. हे सर्व मोहामुळेच रडतात. बिनस्वार्थाची ही दुनिया नाहीच आणि जिथे स्वार्थ आहे तिथे मोह आहे. आई बरोबरही स्वार्थ आहे. लोक असे समजतात की, आई वर शुद्ध प्रेम असते, परंतु स्वार्थाशिवाय तर आई सुद्धा नाही, पण तरी तो लिमिटेड स्वार्थ आहे, म्हणून त्याची प्रशंसा केली आहे, कमीत कमी-मर्यादित स्वार्थ आहे. शेवटी तर हा सुद्धा मोहाचाच परिणाम आहे.
प्रश्नकर्ता : ते ठीक आहे, परंतु आईचे प्रेम तर नि:स्वार्थ असू शकते ना?
दादाश्री : बहुतांशी नि:स्वार्थच असते. म्हणून तर आईच्या प्रेमाला प्रेम म्हटले आहे.
प्रश्नकर्ता : तरी देखील आपण त्यास 'मोह आहे' असे का म्हणता?
दादाश्री : असे आहे, कोणी म्हणेल की, 'भाऊ, प्रेमासारखी वस्तू या दुनियेत नाहीच?' तर पुरावा म्हणून दाखवायचे असेल तर ते आईचे प्रेम हे प्रेम आहे. असे दाखवू शकतो की इथे काही अंशी प्रेम आहे. बाकी दुसऱ्या गोष्टीत काही तथ्य नाही. मुलावर आईचे प्रेम असते, आणि आता इतर सर्व प्रेमापेक्षा ह्या प्रेमाची अधिक प्रशंसा करण्यासारखे आहे. कारण त्या प्रेमात बलिदान आहे.'
प्रश्नकर्ता : आईच्या प्रेमाची वस्तुस्थिती अशी आहे, तर मग वडिलांचा काय वाटा आहे, या प्रेमात...