________________
दादाश्री : केवळ मोहच! वरून चेहरा सुंदर दिसतो, म्हणून प्रेम दिसते. पण ते प्रेम म्हटले जात नाही ना! आता इथे जर एखादे गळू झाले, तर जवळ देखील जाणार नाही. हे तर आंबा चाखून पाहिला तर कळेल. तोंड खराब झाले तर झाले पण महिनाभर खाणेही चांगले वाटत नाही. वर्षभर तोंडावर गळू झाले ना तर तोंड सुद्धा पाहणार नाही, मोह सुटून जाईल. आणि जर खरे प्रेम असेल तर एक काय दोन गळू झाले, तरीही प्रेम सुटणार नाही. म्हणजे असे प्रेम शोधून काढा, नाही तर लग्नच करू नका, केलेत तर फसाल. मग ती जेव्हा तोंड फुगवेल तेव्हा म्हणाल, 'मला तर हिचे तोंडच बघावेसे वाटत नाही.' अरे तोंड चांगले वाटले होते म्हणून तर तू तिला पसंत केलेस आणि आता पसंत नाही म्हणतोस? गोड गोड बोललात तर आवडते. आणि कडू बोलाल तर म्हणेल, 'मला तू अजिबात आवडत नाही.'
प्रश्नकर्ता : ती सुद्धा आसक्तीच म्हणायची ना?
दादाश्री : सर्व आसक्तीच. 'आधी पसंत होते आणि आता पसंत नाही, आधी पसंत होते आणि आता पसंत नाही' अशी कुरकुर करत राहतो. अशा प्रेमाचा काय उपयोग?
मोहात दगा-फटका खूप मार खातो तेव्हा जो मोह होता ना, तो मोह सुटतो. केवळ मोहच होता. मोहाचाच मार खात राहिला.
प्रश्नकर्ता : मोह आणि प्रेम या दोघांमधील भेदरेषा काय आहे ?
दादाश्री : हा काजवा आहे ना, तो दिव्याभोवती फिरून स्वाहा होतो ना? तो स्वत:चे जीवन संपवून टाकतो, यास मोह म्हटले जाते. पण प्रेम तर टिकते, प्रेम टिकाऊ असते, मोह टिकत नाही.
मोह म्हणजे युजलेस (निरूपयोगी) जीवन. ते तर आंधळे होण्यासारखेच आहे. जसे आंधळा माणूस काजव्यासारखा फिरत असतो आणि मार खातो तसेच, आणि प्रेम तर टिकाऊ असते, प्रेमात तर