________________
आयुष्यभरासाठी सुख हवे असते. तात्पुरतचे सुख शोधावे असे नाही ना!
म्हणजे हा सर्व मोहच आहे ना! मोह म्हणजे उघड-उघड दगाफटका. मोह म्हणजे शंभर टक्के धोकाच.
प्रश्नकर्ता : परंतु हा मोह आहे आणि हे प्रेम आहे असे सामान्य व्यक्तीला कसे समजणार? एखाद्या व्यक्तीचे खरे प्रेम आहे की, तो त्याचा मोह आहे हे सामान्य व्यक्तीला कसे समजणार?
दादाश्री : ते तर त्याला खडसावल्यावर आपोआपच कळते. एखाद्या दिवशी त्याला खडसावले आणि तो जर चिडला तर कळते ना की हे युजलेस आहे. मग काय दशा होईल? त्यापेक्षा आधीच खडसावून पाहावे. रुपया असा खणखणून पाहतो ना, खरा आहे की, खोटा आहे ते लगेच कळते ना? काही तरी बहाणा करून त्याला खडसावे. आता तर निव्वळ भयंकर स्वार्थ! स्वार्थासाठी सुद्धा प्रेम दाखवतात. पण कधीतरी खडसावून पाहिले तर समजेल की हे खरे प्रेम आहे की नाही? ।
प्रश्नकर्ता : खरे प्रेम असेल तर खडसावल्यावर कसे असते?
दादाश्री : समोरच्याने खडसावले तरी स्वतः शांत राहून त्याला नुकसान होणार नाही असे वागतो. खरे प्रेम असेल तर सर्व गिळून टाकतो. पक्का बदमाश जरी असेल तरी पण तो गप्प बसतो.
ते प्रेम की लफडे? प्रश्नकर्ता : दोन प्रेमी असतील आणि घरच्यांची समंती नसेल तर, आत्महत्या करतात, असे बऱ्याचदा घडते. तर ते जे प्रेम आहे, त्यास कुठले प्रेम म्हटले जाईल?
दादाश्री : उथळ प्रेम! त्यास प्रेमच कसे म्हणता येईल? इमोशनल होतात आणि रुळावर झोपतात! आणि म्हणतात, 'पुढच्या जन्मी आम्ही दोघे सोबतच असू.' तर अशी आशा कोणीही बाळगू नये. ते त्यांच्या कर्माच्या हिशोबानुसार जन्म घेतात. पुन्हा कधी भेटतही नाहीत!!
प्रश्नकर्ता : पुन्हा भेटण्याची इच्छा असेल तरीही भेटत नाहीत?